Followers

मंगळवार, डिसेंबर २८, २०२१

इवलसं मन

इवलसं मन माझं
घेतय हो उंच भरारी
गगनाला  गवसणी
घालून मारतंय फेरी

इवलसं मन माझं
झालंय फुलपाखरू
बालपणीच्या आठवणीत
रमलं कसं आवरू

इवलसं मन माझं
गेलं एकदा माहेरी
आई-बाबांशी गूज
करुन फिरलं माघारी

इवलसं  मन  माझं
गेलं ' अहो 'च्या ऑफिसात
गर्रऽकन गिरकी मारुन
परत आलं हो  घरात !

© पुष्पा पटेल "पुष्पम्"

रविवार, डिसेंबर २६, २०२१

मृदगंध

डूबी हू तेरे प्यार में
तुझ्या प्रीतीचा गंध बेधुंद!
बिना बारीश भीगी रे मै रसीया
तू आषाढ मेघसरी मी रे मृदगंध!


© पुष्पा पटेल "पुष्पम्"


शनिवार, डिसेंबर २५, २०२१

उंच भरारी

मुक्त  आभाळी  घेतली  उंच भरारी
नवी  उमेद  नवा विश्वास  ठेवून मी
जुनी आपुलकी आज फळा आली
नंदनवनात  भ्रमंती करुन आले मी


© पुष्पा पटेल " पुष्पम् "

शुक्रवार, डिसेंबर २४, २०२१

शब्दफुले

सागरापाशी आहे शुभ्र मोती
नाही  रे  अप्रुप   त्याचे  मला
तुझ्या  लेखनीतील शब्दफुले
सख्या भुरळ घालती रे  मला

© पुष्पा पटेल " पुष्पम् "

गुरुवार, डिसेंबर २३, २०२१

वाट अनोळखी!

मनात ठेऊन आत्मविश्वासाची धग
अनोळखी वाटेवरुन चालतेय मी!
तमा ना बाळगली मी खाचखळग्यांची
शिखर गाठले धैर्याने ठेवून युक्ती नामी!

जे मिळविले ज्ञान ध्यानी ठेविले
पावलागणिक गुरुपदेश स्मरण केला मी
चालता वाट सापडे थांबला तो संपला
दिशाहिन वा-यातही यशोशिखरी पाय रोवले मी !

© पुष्पा पटेल " पुष्पम् "

बुधवार, डिसेंबर २२, २०२१

नाती ममतेची

तमा  कशाचीही न  बाळगता मी नेहमी
केली हो मी सर्वांना मदत आपुलकीने
व्देष मनात कधीच फिरकू दिला नाही
जोडली नाती मी सर्वांशी माया-ममत्वाने !

© पुष्पा पटेल "पुष्पम्"

रविवार, डिसेंबर १९, २०२१

कृपाळा

असं काहीतरी नवीन
घडावे हो वेगळे...
आनंदाचा भरात मी जाऊन
सांगावं तुला सगळे...
अशी वेळ यावी कृपाळा
नमिते तुज रुप तुझे आगळे...


© पुष्पा पटेल "पुष्पम्"

शनिवार, डिसेंबर १८, २०२१

मोकळा श्वास

संसारात  गुंता सोडवताना
मन  झाले  हो माझे उदास
गुंतून पडणे सोडून दिले मी
आता  घेतेय मोकळा श्वास


© पुष्पा पटेल " पुष्पम् "

शुक्रवार, डिसेंबर १७, २०२१

आई

रमते घरात मायेने ती असते आई !
सर्वांच्या हिताचे निर्णय घेते ती आई !

स्वतःचा इच्छा बाजूला सारते आई !
घरासाठी कष्टत जगते ती तर आई !

सुख दुःखात ठाम उभी असते आई !
संकट येता बाळावरती वाघिण होते आई !

' होईल सगळं नीट ' म्हणून धीर देते आई !
भिऊ नको! चालत रहा! बळ देते आई !

बाळाच्या सुखात लोभ न दावी आई
निष्काम कर्मयोग शिकवित जगते आई!


© पुष्पा पटेल "पुष्पम्"

गुरुवार, डिसेंबर १६, २०२१

प्रिय शब्दसुमनांनो

माझ्या प्रिय शब्दसुमनांनो...!
तुम्ही असे दूर-दूर राहू नका

तुमचाच आधार आहे मज
हे तुम्ही कधी विसरू नका !

तुमच्या द्वारे मनीचे गुज उतरे
सुख लेखणीचे  हिरावू नका !

© पुष्पा पटेल "पुष्पम्"

बुधवार, डिसेंबर १५, २०२१

अमृत चहा

जागतिक चहा दिनाच्या सर्वांना अमृतमय शुभेच्छा 💐💐💐
चहा म्हणजे संजीवनी असतो
रुग्णाची स्फूर्ती 
जगण्याची उर्मी 
कार्य करण्याची शक्ती
म्हणजे चहा...
कुणी चहा पितो
कुणी चहा पिते
कुणी म्हणे चहा घेतली का?
कुणी म्हणे चहा घेतला का?
कुणी काहीही म्हणा
पण चहा हवाच!
पावसाळ्यात वाफाळणारा
हिवाळ्यात गरम
उन्हाळ्यात गरमागरम
एक एक घोट रिचवावा
पण चहा हवाच!
असा चहा कसाही प्यावा
जमलं तर फुरकत
नाही तर फूऽफूऽ करत
नाही तर एकच घोटात
पण चहा हवाच!
चहालाही आहे
काळवेळेचे भान
तो पाहुणचाराला हवा
तो सुप्रभाती हवा
पार्टीला पहिला मान
मुलाखतीला टेबलावरची शान
असा हा दिव्य चहा हवाच!

© पुष्पा पटेल " पुष्पम् "
    म्हसावद

गीताई

गीता    जन्मोत्सव   साजरा केला
विचार   मी    गीतेचे   अंगिकारले
आधी   केले   मग  जना सांगितले
प्रभूस्पर्शी  शब्द ऐकता धन्य झाले

अठरा अध्यायी साठले ज्ञान भांडार
सातशे   श्लोक भासती जीवनाधार
जन्म  होय  तृप्त   करा   अमृतपान
स्विकारु स्वयें जनांसी देऊ सुविचार

© पुष्पा पटेल " पुष्पम् "

मंगळवार, डिसेंबर १४, २०२१

आनंदाचं जगणं

समजून  सांगते  हो  मी  सर्वांना
लादत नाही मी कधी  माझं म्हणणं
म्हणून तर आलं माझ्या जीवनात 
सुख-समृद्धि आणि आनंदाचं जगणं

© पुष्पा पटेल " पुष्पम् "

रविवार, डिसेंबर १२, २०२१

संकल्प

संकल्प केलाय  हो मी !
घाम गाळीन  स्वकमाई करेन
नाही करणार कोणाची हाजी
स्वाभिमानाने मी जगेन !

© पुष्पा पटेल " पुष्पम् "

शनिवार, डिसेंबर ११, २०२१

आनंदे जगू

जीवन फक्त एकदाच मिळते
व्देष  मत्सर  हा बाजूला ठेवू
प्रेमाने  आणि  आनंदाने जगू
राग नको मानवता जागी ठेवू

© पुष्पा पटेल " पुष्पम् "

शुक्रवार, डिसेंबर १०, २०२१

मौनंम्


मौनंम्   सर्वार्थ   साधनम् !
म्हटले  समाज  धुरीणांनी
उगीच नाही  हो  ही उक्ती
प्रचलित केली  ती सर्वांनी 

© पुष्पा पटेल " पुष्पम् "


गुरुवार, डिसेंबर ०९, २०२१

सुखी सहजीवनाचे सूत्र

सख्या रे...
तोंडात साखर अन् डोक्यावर बर्फ
ठेवलाय की रे  मी आधीच !
सुखी सहजीवनाचे हे खरे सूत्र
संसारी होत नाही वाद-विवाद
कधीच !

© पुष्पा पटेल "पुष्पम्"

बुधवार, डिसेंबर ०८, २०२१

हे दयाळा


अडकवू नको देवा जन्मफे-यात मला
स्वार्थी या जगात मिळे मज उपहास

असह्य होती मज अशा ह्या गोष्टी
देवा लागू दे मना तुझ्या नामाचा ध्यास

आवडते तूज ते !  दिले मी तुला खास 
चरणी तुझ्या मिळो जागा हीच मज आस !

© पुष्पा पटेल "पुष्पम्"

मंगळवार, डिसेंबर ०७, २०२१

सवय


कितीदा तुला सांगावे
मला काहीच कळेना
उशिरा उठायची सवय
तुझी जाता जाईना
"लवकर निजे लवकर उठे
त्यासी ज्ञानसंपत्ती भेटे"
हा मंत्र तू अंमलात आणना!

© पुष्पा पटेल "पुष्पम्"

सोमवार, डिसेंबर ०६, २०२१

निष्काम भक्ती


आहे हो  कृपा  भगवंताची
केली   मी  भक्ती  निष्काम
स्वतःचे असे काही  मिळावे
म्हणून केले  निष्ठेने मी काम!

© पुष्पा पटेल "पुष्पम्"

रविवार, डिसेंबर ०५, २०२१

सुखाचे वारे

दुःखाचा भागाकार केला
विसरले आहे दुःख  सारे

सुखाचा  क्षण आणलाय
नको आता वेदनेचे पहारे

तुझी कृपा असू द्या साई
दुःखातही वाहतील सुखाचे वारे!

© पुष्पा पटेल "पुष्पम्"

शनिवार, डिसेंबर ०४, २०२१

मी भाग्यवंत!


आहे  प्रभूजीचा हात शिरावर
नाही हो  मला कुठलीच  खंत
का  ठेऊ मी मनात किंतू-परंतू
माझ्यासारखी मीच भाग्यवंत !


© पुष्पा पटेल "पुष्पम्"

शुक्रवार, डिसेंबर ०३, २०२१

खेळ भावनांचा

भावनांचा खेळ सारा
कुठवर खेळशी मना

जगी स्वार्थाचा बाजार
दखल  कुणी घेई ना

आपुलेच निघाले बेईमान
दुस-यासी बोलवेना

© पुष्पा पटेल "पुष्पम्"

गुरुवार, डिसेंबर ०२, २०२१

चांद रात


सख्या चांदणे हे मनोहर आहे
नको देऊ दूर रहाण्याची सजा
ये ना या शितल अशा  रात्रीत 
घेऊ मनसोक्त फिरण्याची मजा!

© पुष्पा पटेल "पुष्पम्"

बुधवार, डिसेंबर ०१, २०२१

माझी धडपड

 समजून घेता घेता
ओलावतात डोळ्याचे कड

आयुष्याच्या पदपथावर चालतांना
करावीच लागते थोडीशी तडजोड

सगळ्यांची मर्जी  सांभाळून
स्वप्नांचा होतो सतत विमोड

स्वाभिमान राखताना मात्र मी
जीवापाड  करते  हो धडपड

© पुष्पा पटेल " पुष्पम् "

मंगळवार, नोव्हेंबर ३०, २०२१

तुझी साहित्य संपदा


सख्या काय लिहू तुझ्यासाठी
शब्दच माझे थिटे पडले...
तरीही शब्दांना मात्र वेध 
तुझेच का रे लागलेले...
तुझी साहित्य संपदा बघुन
मन माझे तृप्त झाले...

© पुष्पा पटेल "पुष्पम्"

सोमवार, नोव्हेंबर २९, २०२१

सखा


साथ  तुझी  आहे  दयाळा
म्हणून  घेतली  उंच  भरारी
जगी  विहरते रे मी आनंदाने
तुच माझा सखा कृष्णमुरारी!

© पुष्पा पटेल "पुष्पम्"

रविवार, नोव्हेंबर २८, २०२१

अनमोल नातं

आजी नातूचं नातं म्हणजे
दुधावरची साय अनमोल!

त्यात गुरफटावं खोलवर
तेव्हा कळते त्याचे मोल!

त्यात नसतं सतावणं,रुसणं
फिरावं फक्त गोलंगोल!

© पुष्पा पटेल " पुष्पम् "

शनिवार, नोव्हेंबर २७, २०२१

माझं जग

नाही  राहिली  मी कधी तुझ्याविना
नोंदी ना ठेवल्या मी ह्या जगण्याचा
तुझ्या  विना नाही रे  माझं  हे  जग
प्रश्नच नाही तुझ्यापासून दूर जाण्याचा!

© पुष्पा पटेल " पुष्पम् "

शुक्रवार, नोव्हेंबर २६, २०२१

दातृत्व

देवा  तुझ्या  दातृत्वाचा
सुगावा  नाही  लागत  रे 
देतोस  तू  मज  भरभरून
समाधानाने भरून पावते रे!

© पुष्पा पटेल "पुष्पम्"

गुरुवार, नोव्हेंबर २५, २०२१

फुलवात

"कराग्रे वसते लक्ष्मी " म्हणूनी 
करते मी  दिवसाची सुरुवात
विचारांची अडगळ दूर करुन
लावते  ईशनामाची फुलवात!

© पुष्पा पटेल " पुष्पम् "

बुधवार, नोव्हेंबर २४, २०२१

रे सख्या

तुझी  सोबत  असतांना
वादळ  मनातलं  शमलं
समुद्रकिनारी  फिरतांना
सख्या मन तुझ्यातच रमलं!

© पुष्पा पटेल "पुष्पम्"

रविवार, नोव्हेंबर २१, २०२१

आठवणींची मैफिल

दिवाळसणाला यावर्षी अहोंकडून चांगली आठदिवसाची सुट्टी काढली.आणि विशेष म्हणजे त्यांनी ती का-कू न करता दिली.
"केवढा आनंद झाला म्हणून सांगू!"
घरातली कामं सगळी आटोपून आणि ह्यांच्या दोन वेळचा डब्याची सोय करून मी एकदाची निघाली माहेरी मुलाला सोबत घेऊन.
आज भाऊबीज असल्याने सगळेच एकत्र जमणार म्हणून केवढी ती आतुरता! मन अगदी वसंतात नवी पालवी फुटलेल्या वृक्षाप्रमाणे बहरलं होतं.
गाडी पटकन बाबांच्या अंगणात थांबली आणि माझी विचारांची तंद्री तुटली.मुलाने हाॅर्न वाजवताच दोघे भाचे "आत्तु आली,आत्तु आली" करत अंगणात उतरत माझ्याकडे आली.दोघांना जवळ घेत मी घरात आले.
ओसरीत मी येणार म्हणून आतुरतेने येरझारा घालणारे बाबा,आणि  माझ्या भेटीची हुरहूर लागलेली आई, कालपासून येऊन माझी वाट बघणारी बहिण, 
भाऊ , वहिनी, बहिणीच्या मुली सगळेच माझी आतुरतेने वाट बघत होते.
सगळ्यांना बघून भेटून मन अगदी प्रसन्न झाले.
सगळं कसं अगदी आल्हाददायक वातावरण होते.जेवणावळी उठल्या.आवरासावर करून आमच्या भावंडांची अंताक्षरीची मैफिल रंगली.एकापेक्षा एक जुनी गाणी गाऊन आम्ही आमच्या बालपणीच्या आठवणी जाग्या करीत होतो.बालपणातही आम्ही असेच खेळ खेळायचो.तेव्हाचे ते दिवस,प्रसंग, हास्यकल्लोळ झाडपानातून सूर्यकिरणांच्या कवडसा यावा.तशा मनाच्या कोनाडयातून बाहेर पडत होते. 

© पुष्पा पटेल " पुष्पम् "

शनिवार, नोव्हेंबर २०, २०२१

वीण नात्यांची

नात्याची वीण घट्ट आहे माझी
वादाला माझ्या घरी नसे थारा
आनंदाला फक्त  घालते वारा

© पुष्पा पटेल "पुष्पम्"

गुरुवार, नोव्हेंबर १८, २०२१

प्रीतकाव्य

पुन्हा एकदा सांग  ना  सख्या
तुझ्या   प्रीतीची  रीतच  न्यारी
मनातलं तुझ्या ओळखायचं कसं
करतो तू प्रीतकाव्य लईच भारी!

© पुष्पा पटेल "पुष्पम्"

मंगळवार, नोव्हेंबर १६, २०२१

क्षण तो निश्चयाचा !

लढली   जीवनात   मी  खुमखुमीने
मिळाले   यश   मला   आत्मबळाने

नाही   मी  अबला  मी  सबला नारी
समाजाला   दिशा  दिली  कर्तृत्वाने

निश्चयाचा  महामेरू  उभा  केला मी
जगण्याचा आदर्श ठेवला स्वबळाने!

© पुष्पा पटेल " पुष्पम् "

सोमवार, नोव्हेंबर १५, २०२१

अमृतनाम


देवा अमृताहूनी गोड तुझे
एक एक रे नाम !
हृदयी भरीते विसरुन काम
तूच माझ्या शाम तूच राम
जीवांचा तूच विश्राम
विठ्ठला ! तूच रे कैवल्यधाम
तूझे पाहता रुप
जीवा लागे आराम
रुक्मिणीवरा,स्विकार माझा प्रणाम!

© पुष्पा पटेल " पुष्पम् "

रविवार, नोव्हेंबर १४, २०२१

मधूर स्वर

तुझ्या मधूर स्वरांनी
प्रभात माझी गोड झाली

तुझ्या स्वरांचा दुनियेत
मी   माझी  ना राहीली

तुझ्या अमृतापरी गोड शब्द
प्राशुन मी  तृप्त झाली


© पुष्पा पटेल "पुष्पम्"

शुक्रवार, नोव्हेंबर १२, २०२१

निर्धार

निर्धार माझा आग आहे...
त्यास लाभे तेजाची झळाळी
पाहता बसे डोळ्यांना झाक!
निर्धारापुढे येतील जे काही
त्याची करेन मी चिमूटभर राख!

© पुष्पा पटेल " पुष्पम् "

गुरुवार, नोव्हेंबर ११, २०२१

विश्वास

किनारा दुर हैं साथी
हाथ पकड के रखो
हालांत सुधर जायेंगे
विश्वास मुझपे  रखो

© पुष्पा पटेल "पुष्पम्"

बुधवार, नोव्हेंबर १०, २०२१

प्रितकळी

सख्या, तुझे स्मित हास्य फुलविते 
गुलाबी  प्रितकळी  माझ्या  हृदयी
फुललेल्या  त्या  गुलाबाचा गंधात
भ्रमर होऊन हरवतो तू त्या समयी...!

© पुष्पा पटेल " पुष्पम् "

मंगळवार, नोव्हेंबर ०९, २०२१

तुझी कृपा राहो!

तुझे  नाम आळविता आई
क्षणभर दुःख  मी  विसरते

क्लेश  सारे   गळून  पडती
आनंदसागरी  मी  हो डुंबते

अशीच कृपादृष्टी ठेव जगदंबे
मी नमन तुज साष्टांग  करीते🙏🙏

© पुष्पा पटेल " पुष्पम् "

सोमवार, नोव्हेंबर ०८, २०२१

असावा सांगाती

तुझा विसर न व्हावा देवा !
केला मी सत्याचा अट्टाहास

दूर ठेव तम ने तू प्रकाशदिशी 
असू दे तुझा कायम सहवास

कलह क्लेशासी ठेवावे तू दूर
जेथे जाईन तेथे असू दे तुझा वास

© पुष्पा पटेल " पुष्पम् "

रविवार, नोव्हेंबर ०७, २०२१

जाणीव

चंद्र जरी झाकोळला
जाणीव ती चांदणीला
मनात तिच्या कृतज्ञता
आहे भान त्या वेडीला

© पुष्पा पटेल "पुष्पम्"

शनिवार, नोव्हेंबर ०६, २०२१

प्रिय बालपण

प्रिय मला  माझं  बालपण
त्यात न  कुठले अहंमपण
निर्मळ  निरागस  गोडपण
केली मज्जा, मस्ती, खेळणं
क्षणात भांडण न् क्षणात गट्टी
अनुभवले मी माझे बालपण

© पुष्पा पटेल "पुष्पम्"

शुक्रवार, नोव्हेंबर ०५, २०२१

विसर ते सारे!

झालं गेलं विसरून 
गोड मानून घ्यायचंं!

जीवन खळाळता झरा
आनंद घेत जगायचं!

मन मारत जगण्यापेक्षा
हसत खेळत रहायचं!

© पुष्पा पटेल "पुष्पम्"

दिवाळी पाडवा

तेजोमय   झाला  आजचा  दिनू
प्रकटली   हो  माझी   गृहलक्ष्मी
अंधारातून नेई मज प्रकाशदिशी
अशी  दिव्यत्व माझी अष्टलक्ष्मी !

आज  नववर्ष   दिवाळी  पाडवा
साडेतीन  मुहूर्तांत  एक   पवित्र
टळो    इडा   पिडा   जळो  दैन्य
नांदु दे भूवरी बळीराजाचे राज्य!

🪔 दिवाळी पाडवा आणि नववर्ष
 [ विक्रम संवत-२०७८] हार्दिक शुभकामना!🪔 

© पुष्पा पटेल " पुष्षम् "

गुरुवार, नोव्हेंबर ०४, २०२१

शुभ दिपावली

आली आली शुभ  दिपावली
दारी लक्ष लक्ष दिप उजळती

अंधार हा मनीचा नष्ट करुनी 
हृदयी  आनंद फुले  उमलती

करा सौख्य समृद्धीचा फराळ
गृहलक्ष्मी घरी आनंद फुलवती

© पुष्पा पटेल " पुष्पम् "

बुधवार, नोव्हेंबर ०३, २०२१

मैं हुं ना !


तुझ्या स्मित  हास्यात  दडलंय
😊 😊 😊 😊 😊 😊 😊
राजा आपुल्या सुखाचं गणित
🌹🌹🌹🌹👥🌹🌹🌹🌹
भले येऊ दे रे  कितीही  संकटे
🕺👥 👍 👥 👍 👥 👍🕺
लावू परतवून ते खणखणीत !
⏹️🌹⏺️🕺⏹️👍🕺⏺️🌹

© पुष्पा पटेल " पुष्पम् "

मंगळवार, नोव्हेंबर ०२, २०२१

धनत्रयोदशी


झालं गेलं सोडून
करा प्रेमाने अभ्यंग स्नान
करा शुद्धमने  धनलक्ष्मी पूजा,
येईल दारी यशाचे प्रकाशदान
किल्मिष जाळा ठेवा शुद्ध मन
मिळेल समृध्दीचे पाडव्याचे वाण
करा  स्नेह  सौख्य संबंधांचा फराळ
होईल प्रेमाची भाऊबीज
अविट माधुर्याची छान!
🪔💎🪔💎🌹💎🪔💎🪔
                           प्रिय वाचकहो...!
धनत्रयोदशीच्या आपणास व आपल्या
प्रिय परिवाराला आरोग्यदायी,सुखदायी
🌟🌟🌹🪔मंगलमय शुभेच्छा!🌹🪔🌟🌟

© पुष्पा पटेल "पुष्पम्"

सोमवार, नोव्हेंबर ०१, २०२१

शुभ दिपावली

गोडवा दिवाळसणाचा
हवाहवासा वाटतो...
पणतीचा उजेडात
मनामनातील काळोख
दूर  दूर  होतो
इष्ट मित्र स्नेही...
आप्तेष्टांची भेट होता
हृदयी स्नेह सौख्याचा 
परीमळ दरवळतो़

🎇🪔🌹🪔🌹🪔🌹🪔🌹🪔🌹🎆
ही दिपावली आपणास व आपल्या परिवारास सुखासमाधानाची,आनंदाची,
समृद्धीची,व सकल इच्छापूर्ती करणारी जावो! ही शुभेच्छा!🪔

🪔दिवाळी सणाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा!

  ्©पुष्पा पटेल " पुष्पम् "
        🪔🎊 🎆🙏🌹🙏🪔🎉🎇🧨

देवा...

देवा,एक धागा सुखाचा  तू दिला रे माझ्या हाती उजेड देण्या सृष्टीला... वळीन मी जन्मभर वाती © सौ.पुष्पा पी.पटेल