Followers

बुधवार, ऑक्टोबर २०, २०२१

स्वाभिमान

जिथं खरं बोललेलं चालत नाही
त्याजागी जाणं माझं होत नाही
स्वाभिमान  ठेवते मनात...
मागे वळून मी बघत नाही

© पुष्पा पटेल "पुष्पम्"

तूझी पूनव

तू माझा चंद्रमा, आहे मी तुझीच पूनव
तुझ्या प्रीतीचा  लागला आहे मला गंध
तुझ्या अमृत सहवासात उजळलं माझं जीवन
तुझ्या सोबतीने मिळतोय मला आनंदीआनंद

© पुष्पा पटेल " पुष्पम् "

ओल्या सांजवेळी!

सख्या ओल्या सांजवेळी  मन माझे हिंदोळ्यावर झुले  तू येण्याची चाहूल लागताच  हृदयी माझ्या वसंत फुले  सख्या ओल्या सांजवेळी  नजर माझी...