चहा म्हणजे संजीवनी असतो
रुग्णाची स्फूर्ती
जगण्याची उर्मी
कार्य करण्याची शक्ती
म्हणजे चहा...
कुणी चहा पितो
कुणी चहा पिते
कुणी म्हणे चहा घेतली का?
कुणी म्हणे चहा घेतला का?
कुणी काहीही म्हणा
पण चहा हवाच!
पावसाळ्यात वाफाळणारा
हिवाळ्यात गरम
उन्हाळ्यात गरमागरम
एक एक घोट रिचवावा
पण चहा हवाच!
असा चहा कसाही प्यावा
जमलं तर फुरकत
नाही तर फूऽफूऽ करत
नाही तर एकच घोटात
पण चहा हवाच!
चहालाही आहे
काळवेळेचे भान
तो पाहुणचाराला हवा
तो सुप्रभाती हवा
पार्टीला पहिला मान
मुलाखतीला टेबलावरची शान
असा हा दिव्य चहा हवाच!
© पुष्पा पटेल " पुष्पम् "
म्हसावद
वाफाळता चहा .. मस्त चहा🍵☕🫖👌👌
उत्तर द्याहटवाखूप सुंदर कविता👌👌👌👌
उत्तर द्याहटवाव्वा...व्वा...अतिशय सुंदर अमृताचा चहा💐💐👌👌👌
उत्तर द्याहटवाखूप सुंदर रचना 👌👌👌
उत्तर द्याहटवाअप्रतिम
उत्तर द्याहटवा