माझं जीवन ग् उजळवलेस
काजव्यापरी येऊन तू माझ्या
आयुष्याला प्रकाशमान केलेस
प्रारंभी भासलीस ग् तू मजला
जणू एक पणती मिणमिणती
काळोख्या वाटेवर तूच झालीस
आशाकिरणाची समई जाणती
तू सखी सोबती तू सहचारिणी
तुझ्या सवे आयुष्याला ग् गती
आता तर अंधाराला ही वाटे ग्
तुझ्या-माझ्यासमोर यायची भीती!
© पुष्पा पटेल " पुष्पम् "