Followers

बुधवार, डिसेंबर १५, २०२१

गीताई

गीता    जन्मोत्सव   साजरा केला
विचार   मी    गीतेचे   अंगिकारले
आधी   केले   मग  जना सांगितले
प्रभूस्पर्शी  शब्द ऐकता धन्य झाले

अठरा अध्यायी साठले ज्ञान भांडार
सातशे   श्लोक भासती जीवनाधार
जन्म  होय  तृप्त   करा   अमृतपान
स्विकारु स्वयें जनांसी देऊ सुविचार

© पुष्पा पटेल " पुष्पम् "

८ टिप्पण्या:

  1. गीता ग्रंथ खरोखर वैश्विक आई आहेच! अप्रतिम शब्दांत गीता महात्म्य वर्णन केले आपण!✍️👌👌👌
    जय योगेश्वर 🌹🙏🙏🙏

    उत्तर द्याहटवा
  2. खूप सुंदर रचना केली मॅडम 👌👌👌👌👌

    उत्तर द्याहटवा

देवा...

देवा,एक धागा सुखाचा  तू दिला रे माझ्या हाती उजेड देण्या सृष्टीला... वळीन मी जन्मभर वाती © सौ.पुष्पा पी.पटेल