Followers

मंगळवार, ऑक्टोबर १२, २०२१

अस्तित्व

अवघडच गणित का  बरं सोडवायचं
थोडंस रिलॅक्स जीवन जगून बघायचं
सगळं बाजूला सारून आनंदें जगायचं
स्वतःच अस्तित्व जरा शोधून बघायचं!

© पुष्पा पटेल "पुष्पम्"

पहाटेचं स्वप्न (त्रिवेणी)

देवा धुके हे संकटाचे विरु दे जरा
आधारवड आहे रे तू आमुचा खरा
पहाटेचं स्वप्न माझं पूर्ण होऊ दे जरा

© पुष्पा पटेल "पुष्पम्"

देवा...

देवा,एक धागा सुखाचा  तू दिला रे माझ्या हाती उजेड देण्या सृष्टीला... वळीन मी जन्मभर वाती © सौ.पुष्पा पी.पटेल