आता नको ना करु ग् कष्ट !
आता तरी जग स्वतःसाठी
आरोग्याला आहे वेळ इष्ट
भल्या पहाटे उठून सारे
काम हातावेगळे करते
कधीतरी निवांत बसून
घे मज्जा बघ कसे वाटते
जीवाला जीव लावणारी ग्
आई माणसं तू जमवली
राग लोभ मनी न ठेवता
ऋणानुबंधात ती बांधली
सगळ्यांचं सगळं केलं तू
दुःख संकटे सारे झेलले
आई तरी तुझ्या मुखातून
अमृताचे झरे पाझरले
आई अनंत माया ममता
सदैव करते पिल्लांवर
एकदा तरी करुन बघ
प्रेम तुझे तू ग स्वतःवर
©® सौ पुष्पा पटेल "पुष्पम् "