अस्तित्वाचा शोध घेतांना
खाचखळग्याची वाट तुडवतांना
अवचित लाभला तुझा हात
विखुरलेल्या स्वप्नांची पानं
धुंडाळतांना तूच दिली मज
आपुलकीची दाद !
जीवन खूप सुंदर आहे
तूच तर समजावले मला !
जन्म-मरणाचे उकलून राज
केलाय मी संकल्प...
तुझ्याच पाऊलावर पाय ठेऊन
चढते-उतरतेय मी तुझ्यासवे
निर्धाराने सुख-दुखाच्या घाट
मनात पेटवून घेतलाय मी
एक आशेचा दिवा...
हाती घेऊन चालतेय मी
आयुष्याची वाट
सख्या ! विश्वास आहे मला
तुझ्या सहवासात गवसेल
मला प्रकाशदिशेला नेणारी पहाट!
©® पुष्पा पटेल " पुष्पम् "
अप्रतिम जीवनानुभव मांडणारी कविता!✍️👌👌👌
उत्तर द्याहटवासुंदरच.... अप्रतिम शब्द रचना 👌👌👌
उत्तर द्याहटवाअप्रतिम वर्णन
उत्तर द्याहटवाअप्रतिम रचना..👌👌👌
उत्तर द्याहटवाखुप सुंदर , ह्रदयस्पर्शी रचना...👏👏👏
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर 👌👌👌👌🙏🙏
उत्तर द्याहटवा