विचार मी गीतेचे अंगिकारले
आधी केले मग जना सांगितले
प्रभूस्पर्शी शब्द ऐकता धन्य झाले
अठरा अध्यायी साठले ज्ञान भांडार
सातशे श्लोक भासती जीवनाधार
जन्म होय तृप्त करा अमृतपान
स्विकारु स्वयें जनांसी देऊ सुविचार
© पुष्पा पटेल " पुष्पम् "