प्रत्येक स्री एक रहस्य आहे
जाणणे नव्हे सोपे कठीण फार
करते हो घरासाठी कष्ट अपार
हृदयी जपते ती मूल्य हजार
त्याग बलिदान तिचे अपरंपार
ध्येय गाठते ती होई ना लाचार
प्रेम, जिव्हाळा , तिचे रत्नहार
रेशीमबंधांनी देते घराला आकार
स्वार्थ ना तिला मुळीच कसला
कुटुंबातील सर्वांचे स्वप्न साकार!
©®सौ.पुष्पा पटेल "पुष्पम्"