Followers

बुधवार, मार्च २३, २०२२

आई!

नऊ महिने पोटी माझं ओझं
घेऊन वावरलीस तू आई !
तुझ्या माया- ममत्वाला 
त्रिभूवनी तरी उपमाच नाही
 
तुझ्या आईपणाचा देवालाही हेवा
देवही म्हणे मी होईन आई
युगे अठ्ठावीस पंढरपुरी
कर कटेवरी घेऊन झाला विठाई

आई तुझ्या प्रेमाची ओंजळ 
सरता सरत नाही
किती सांगू तुझी महती 
शब्दात मावत नाही 

तुझा त्याग आणि समर्पणाला 
मी जन्मभरी कृतज्ञ आई !

©®सौ.पुष्पा पटेल "पुष्पम्"

९ टिप्पण्या:

  1. खुपच सुंदर शब्दरचना 👌👌👌🙏🏼🙏🏼✍️✍️

    उत्तर द्याहटवा
  2. व्वाऽ..!
    अप्रतिमच...👌
    भाव भावना आईस ..!👌
    🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
    आबा
    🙏

    उत्तर द्याहटवा
  3. सुरेख शब्दांकन, हृदयस्पर्शी रचना...👏👏👏
    मातृदेवो भव:!!

    उत्तर द्याहटवा

देवा...

देवा,एक धागा सुखाचा  तू दिला रे माझ्या हाती उजेड देण्या सृष्टीला... वळीन मी जन्मभर वाती © सौ.पुष्पा पी.पटेल