ओलावतात डोळ्याचे कड
आयुष्याच्या पदपथावर चालतांना
करावीच लागते थोडीशी तडजोड
सगळ्यांची मर्जी सांभाळून
स्वप्नांचा होतो सतत विमोड
स्वाभिमान राखताना मात्र मी
जीवापाड करते हो धडपड
© पुष्पा पटेल " पुष्पम् "
देवा,एक धागा सुखाचा तू दिला रे माझ्या हाती उजेड देण्या सृष्टीला... वळीन मी जन्मभर वाती © सौ.पुष्पा पी.पटेल