सापडतील का ग् तुझ्याकडे ?
पुसून आलो ग् मी दशदिशांना
म्हणाल्या पाहिले ना कुणीकडे
निराश मी साशंक मनाने आलो
प्रिये शोधू कसा इकडे-तिकडे
ऐकता काकणांची किणकिण
क्षणात गवसले ते तुझ्याचकडे
किणकिण वाटे मज मंगलधून
गाती गंधर्व वाजे सनई चौघडे!
© पुष्पा पटेल "पुष्पम्"