"दो जिस्म एक जान है हम"
तू जिव्हाळा मी आपलेपण
तू विश्वास मी समर्पण
तू दिवा तर मी वाती
तू दिस अन् मी राती
तू रत्नाकर मी सरिता
तू पाणी मी झरा वाहता
तू श्वास अन् मी आस
तू स्वप्न तर मी आभास
तू जीवनगाणे मी तराणे
तू चंद्र अन् मी चांदणे
तू क्षीरोदधि मी नीर
तू हृदय अन् मी शिर
कसे म्हणू मी हे वेगळे
हे बंध रेशमाचे जगावेगळे !
©®सौ. पुष्पा पटेल " पुष्पम् "
मु.पो.म्हसावद