तिळाची स्निग्धता
गोडवा गुळ-साखरेचा
घेऊन आला सण मकरसंक्राती
विसरा जुने राग द्वेष अन् क्लेश
धागा गुंफू स्नेह सौख्याचा !
जोपासू आपुलकीची नाती
मनामनात उजळू दे प्रभो !
शुभ मंगलदायक शब्द तेजाचीज्योती!!!
आनंददायी मकरसंक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा!
©® पुष्पा पटेल " पुष्पम् "