Followers

आध्यात्मिक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
आध्यात्मिक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, एप्रिल २०, २०२२

सिक्रेट मिशन !

सिक्रेट मिशन आहे हो...
माझं अन् कुलदेवतेचं खास
माझ्या कुटुंबासाठी राहते ती दक्ष
वर्षाव करते आनंद मोतींची रास !

जेथे जाते मी तेथे असते 
कुलदेवता माझ्या सांगाती
करिते मी सेवा सदैव भक्तीभावे 
लेक मी अन् ती आई सुंदर नाती !

©® पुष्पा पटेल " पुष्पम् "

रविवार, डिसेंबर १९, २०२१

कृपाळा

असं काहीतरी नवीन
घडावे हो वेगळे...
आनंदाचा भरात मी जाऊन
सांगावं तुला सगळे...
अशी वेळ यावी कृपाळा
नमिते तुज रुप तुझे आगळे...


© पुष्पा पटेल "पुष्पम्"

बुधवार, डिसेंबर ०८, २०२१

हे दयाळा


अडकवू नको देवा जन्मफे-यात मला
स्वार्थी या जगात मिळे मज उपहास

असह्य होती मज अशा ह्या गोष्टी
देवा लागू दे मना तुझ्या नामाचा ध्यास

आवडते तूज ते !  दिले मी तुला खास 
चरणी तुझ्या मिळो जागा हीच मज आस !

© पुष्पा पटेल "पुष्पम्"

गुरुवार, ऑक्टोबर २८, २०२१

उतराई


कशी उतराई होऊ देवा
 ऋणातुन  या  जन्मी रे
मनातली  भावना माझी
झाली मनातच अबोल रे

© पुष्पा पटेल "पुष्पम्"

देवा...

देवा,एक धागा सुखाचा  तू दिला रे माझ्या हाती उजेड देण्या सृष्टीला... वळीन मी जन्मभर वाती © सौ.पुष्पा पी.पटेल