Followers

बुधवार, डिसेंबर २२, २०२१

नाती ममतेची

तमा  कशाचीही न  बाळगता मी नेहमी
केली हो मी सर्वांना मदत आपुलकीने
व्देष मनात कधीच फिरकू दिला नाही
जोडली नाती मी सर्वांशी माया-ममत्वाने !

© पुष्पा पटेल "पुष्पम्"

रविवार, डिसेंबर १९, २०२१

कृपाळा

असं काहीतरी नवीन
घडावे हो वेगळे...
आनंदाचा भरात मी जाऊन
सांगावं तुला सगळे...
अशी वेळ यावी कृपाळा
नमिते तुज रुप तुझे आगळे...


© पुष्पा पटेल "पुष्पम्"

शनिवार, डिसेंबर १८, २०२१

मोकळा श्वास

संसारात  गुंता सोडवताना
मन  झाले  हो माझे उदास
गुंतून पडणे सोडून दिले मी
आता  घेतेय मोकळा श्वास


© पुष्पा पटेल " पुष्पम् "

शुक्रवार, डिसेंबर १७, २०२१

आई

रमते घरात मायेने ती असते आई !
सर्वांच्या हिताचे निर्णय घेते ती आई !

स्वतःचा इच्छा बाजूला सारते आई !
घरासाठी कष्टत जगते ती तर आई !

सुख दुःखात ठाम उभी असते आई !
संकट येता बाळावरती वाघिण होते आई !

' होईल सगळं नीट ' म्हणून धीर देते आई !
भिऊ नको! चालत रहा! बळ देते आई !

बाळाच्या सुखात लोभ न दावी आई
निष्काम कर्मयोग शिकवित जगते आई!


© पुष्पा पटेल "पुष्पम्"

गुरुवार, डिसेंबर १६, २०२१

प्रिय शब्दसुमनांनो

माझ्या प्रिय शब्दसुमनांनो...!
तुम्ही असे दूर-दूर राहू नका

तुमचाच आधार आहे मज
हे तुम्ही कधी विसरू नका !

तुमच्या द्वारे मनीचे गुज उतरे
सुख लेखणीचे  हिरावू नका !

© पुष्पा पटेल "पुष्पम्"

बुधवार, डिसेंबर १५, २०२१

अमृत चहा

जागतिक चहा दिनाच्या सर्वांना अमृतमय शुभेच्छा 💐💐💐
चहा म्हणजे संजीवनी असतो
रुग्णाची स्फूर्ती 
जगण्याची उर्मी 
कार्य करण्याची शक्ती
म्हणजे चहा...
कुणी चहा पितो
कुणी चहा पिते
कुणी म्हणे चहा घेतली का?
कुणी म्हणे चहा घेतला का?
कुणी काहीही म्हणा
पण चहा हवाच!
पावसाळ्यात वाफाळणारा
हिवाळ्यात गरम
उन्हाळ्यात गरमागरम
एक एक घोट रिचवावा
पण चहा हवाच!
असा चहा कसाही प्यावा
जमलं तर फुरकत
नाही तर फूऽफूऽ करत
नाही तर एकच घोटात
पण चहा हवाच!
चहालाही आहे
काळवेळेचे भान
तो पाहुणचाराला हवा
तो सुप्रभाती हवा
पार्टीला पहिला मान
मुलाखतीला टेबलावरची शान
असा हा दिव्य चहा हवाच!

© पुष्पा पटेल " पुष्पम् "
    म्हसावद

गीताई

गीता    जन्मोत्सव   साजरा केला
विचार   मी    गीतेचे   अंगिकारले
आधी   केले   मग  जना सांगितले
प्रभूस्पर्शी  शब्द ऐकता धन्य झाले

अठरा अध्यायी साठले ज्ञान भांडार
सातशे   श्लोक भासती जीवनाधार
जन्म  होय  तृप्त   करा   अमृतपान
स्विकारु स्वयें जनांसी देऊ सुविचार

© पुष्पा पटेल " पुष्पम् "

देवा...

देवा,एक धागा सुखाचा  तू दिला रे माझ्या हाती उजेड देण्या सृष्टीला... वळीन मी जन्मभर वाती © सौ.पुष्पा पी.पटेल