Followers

शनिवार, डिसेंबर २५, २०२१

उंच भरारी

मुक्त  आभाळी  घेतली  उंच भरारी
नवी  उमेद  नवा विश्वास  ठेवून मी
जुनी आपुलकी आज फळा आली
नंदनवनात  भ्रमंती करुन आले मी


© पुष्पा पटेल " पुष्पम् "

शुक्रवार, डिसेंबर २४, २०२१

शब्दफुले

सागरापाशी आहे शुभ्र मोती
नाही  रे  अप्रुप   त्याचे  मला
तुझ्या  लेखनीतील शब्दफुले
सख्या भुरळ घालती रे  मला

© पुष्पा पटेल " पुष्पम् "

गुरुवार, डिसेंबर २३, २०२१

वाट अनोळखी!

मनात ठेऊन आत्मविश्वासाची धग
अनोळखी वाटेवरुन चालतेय मी!
तमा ना बाळगली मी खाचखळग्यांची
शिखर गाठले धैर्याने ठेवून युक्ती नामी!

जे मिळविले ज्ञान ध्यानी ठेविले
पावलागणिक गुरुपदेश स्मरण केला मी
चालता वाट सापडे थांबला तो संपला
दिशाहिन वा-यातही यशोशिखरी पाय रोवले मी !

© पुष्पा पटेल " पुष्पम् "

बुधवार, डिसेंबर २२, २०२१

नाती ममतेची

तमा  कशाचीही न  बाळगता मी नेहमी
केली हो मी सर्वांना मदत आपुलकीने
व्देष मनात कधीच फिरकू दिला नाही
जोडली नाती मी सर्वांशी माया-ममत्वाने !

© पुष्पा पटेल "पुष्पम्"

रविवार, डिसेंबर १९, २०२१

कृपाळा

असं काहीतरी नवीन
घडावे हो वेगळे...
आनंदाचा भरात मी जाऊन
सांगावं तुला सगळे...
अशी वेळ यावी कृपाळा
नमिते तुज रुप तुझे आगळे...


© पुष्पा पटेल "पुष्पम्"

शनिवार, डिसेंबर १८, २०२१

मोकळा श्वास

संसारात  गुंता सोडवताना
मन  झाले  हो माझे उदास
गुंतून पडणे सोडून दिले मी
आता  घेतेय मोकळा श्वास


© पुष्पा पटेल " पुष्पम् "

शुक्रवार, डिसेंबर १७, २०२१

आई

रमते घरात मायेने ती असते आई !
सर्वांच्या हिताचे निर्णय घेते ती आई !

स्वतःचा इच्छा बाजूला सारते आई !
घरासाठी कष्टत जगते ती तर आई !

सुख दुःखात ठाम उभी असते आई !
संकट येता बाळावरती वाघिण होते आई !

' होईल सगळं नीट ' म्हणून धीर देते आई !
भिऊ नको! चालत रहा! बळ देते आई !

बाळाच्या सुखात लोभ न दावी आई
निष्काम कर्मयोग शिकवित जगते आई!


© पुष्पा पटेल "पुष्पम्"

देवा...

देवा,एक धागा सुखाचा  तू दिला रे माझ्या हाती उजेड देण्या सृष्टीला... वळीन मी जन्मभर वाती © सौ.पुष्पा पी.पटेल