Followers

गुरुवार, सप्टेंबर ३०, २०२१

उत्तर दे मज!

सवाल पुंछा है मैनै
उत्तर तू मला देशील न्
आस लगायै मैं बैठी हूं सजना
सैय्या माझ्या मनीचे गुज तू ओळख ना

© पुष्पा पटेल " पुष्पम् "

बुधवार, सप्टेंबर २९, २०२१

सुहानी शाम (भूलोळी)

पिया सांज सुहानी थी
तुझी माझी भेट आठवली
तेरे नयनोंकी आशीकी भायी थी
घेऊन मीठीत प्रीत तृष्णा तृप्त केली

© पुष्पा पटेल " पुष्पम् "

आई (भूलोळी)

माॅ आप मेरी ईश्वर
तुझ्या पोटी जन्मले गं आई
हुई मैं तो बहुत ही धन्य धन्य
कशी होऊ मी उतराई सांग ना आई

                       © पुष्पा पटेल " पुष्पम् "

मंगळवार, सप्टेंबर २८, २०२१

समई

प्रिये    हातात  हात  घेऊन तू
माझं जीवन  ग्   उजळवलेस
काजव्यापरी  येऊन तू माझ्या 
आयुष्याला प्रकाशमान केलेस

प्रारंभी भासलीस  ग् तू मजला
जणू एक   पणती मिणमिणती 
काळोख्या वाटेवर तूच झालीस
आशाकिरणाची समई जाणती

तू सखी सोबती तू सहचारिणी
तुझ्या सवे आयुष्याला  ग् गती
आता तर अंधाराला ही वाटे ग्
तुझ्या-माझ्यासमोर यायची भीती!

© पुष्पा पटेल " पुष्पम् "

सोमवार, सप्टेंबर २७, २०२१

गजवदना (अभंग )

हे गजवदना । पार्वती नंदना ।
करीते प्रार्थना । शिवसुता ।।

तू सुखकरता । तू दुःखहरता ।
शुभ लाभ पिता । विद्याधिशा ।।

गणनायक तू । दुःख निवारक ।
तू शुभदायक । लंबोदरा ।।

अष्टविनायक । शुर्पकर्णक तू ।
 महागणेश तू। मोरेश्वरा ।।

© पुष्पा पटेल " पुष्पम् "

रविवार, सप्टेंबर २६, २०२१

पहिली भेट

आठवते न्  तुला  आपली भेट
भेट  तर ती अविस्मरणीय होती 
कोल्ड काॅफीचा घोट घेता आपुली
आपुली गोड प्रीत फुलली होती

© पुष्पा पटेल " पुष्पम् "

शनिवार, सप्टेंबर २५, २०२१

जाई-जुई

प्रिये! तुझ्या भेटीसाठी बहरली जाई-जुई
बावरले मन येण्याची वाट पाही
पहा...आज वाराही स्तब्ध होई 
तुझ्या मुखचंद्र पाहण्या त्यालाही झाली घाई !

© पुष्पा पटेल " पुष्पम् "

शुक्रवार, सप्टेंबर २४, २०२१

मनमंदिर

मी पाहिले प्रथम तुला
त्याक्षणी पडले रे प्रेमात 

स्थान ह्या हृदयी माझ्या
मिळविले तू एका क्षणात

रुबाबदार ऐट तुझी बघून
स्थान हृदयीचा कोंदणात

असांच रहा तू मनमंदिरी
आळविते मी तुला मनात

© पुष्पा पटेल " पुष्पम् "

गुरुवार, सप्टेंबर २३, २०२१

किणकिण

प्रिये हरवलेली शब्दफुलं माझी
सापडतील का ग् तुझ्याकडे ?

पुसून आलो ग्  मी दशदिशांना
म्हणाल्या पाहिले ना कुणीकडे

निराश मी साशंक मनाने आलो
प्रिये शोधू कसा इकडे-तिकडे

ऐकता काकणांची किणकिण
क्षणात गवसले ते तुझ्याचकडे

किणकिण वाटे मज मंगलधून
गाती गंधर्व वाजे सनई चौघडे!

© पुष्पा पटेल "पुष्पम्"

बुधवार, सप्टेंबर २२, २०२१

सैय्या (भूलोळी)

सवाल पुंछा है मैनैै
उत्तर तू मला देशील ना
आस लगायै मैं बैठी हूं सजना
सैय्या माझ्या मनीचे गुज तू ओळख ना!

© पुष्पा पटेल " पुष्पम् "

रंगरसिया (भुलोळी-)

हम है रंगरसिया
आम्हावर ना कसला भार
कोई  कितना भी बिलंदर होवे
आम्हा बाद करणे कठीण आहे फार

© पुष्पा पटेल " पुष्पम् "

मंगळवार, सप्टेंबर २१, २०२१

सख्या रे!

सख्या रे

सांजवेळ झाली आता
थकली रे वाट पाहून
चाहूल लागता तुझी रे
हसू ओसंडलं ओठातून

तुला बघताच ऋतूराज 
वसंत फुलला मम हृदयी
गंगा यमुना बघताच रे
पाण्यावर धावल्या गायी

© पुष्पा पटेल " पुष्पम् "

मनमौजी (शेलकाव्य)


कळत नाही मला रे तुझं

तुझं हे वेळी अवेळी येणं

न  सांगताच रे अचानक

अचानक चिंब भिजवणं


तू येऊन  भिजवतो चिंब

चिंब  होता  मोहरते अंग

माझेच कळत नाही मला

मला क्षणात करी नि:संग

 

आठवतो तो सुखाचा क्षण

क्षण ते  विसरू कसे रे मी

गिरकी   मारुन  घेते   फेर

फेर   धरते  मनमौजी   मी


© पुष्पा पटेल "पुष्पम्"


शनिवार, सप्टेंबर १८, २०२१

एल्गार

 [ सद्य परिस्थिती पाहता महाराष्ट्रात व देशात सर्वच राज्यांमध्ये लेकी-बाळींवर अत्याचाराच्या घटना अनुभवास येत आहे.हे हृदय पिळवटून निघते.त्या अनुषंगाने स्फूरलेली हे काव्य!]


फुलण्याआधी कोमेजून गेल्या

कितीक कोवळ्या सुंदर कळी

नाव असे निर्भया...

मानव विरुद्ध दानववृत्ती झाली बलवान

कितीक झाल्या वासनाच्या बळी

 वासनांध ते हृदयी नसे दयामाया

नराधम कृत्य ओरबाडती ते काया...

बहिरे सरकार नसे रुदन ऐकाया

नको हे यज्ञकुंड! नको झोकू तू काया

उठ...ए नारी ! तू हो नारायणी !

घे हाती तळपती तलवार हो भवानी

बस्स!नको रडणे नको कुढणे 

आता एकच आपुला निर्धार!

मिळून सा-या जणी आपण 

करु नवा एल्गार ! 

नको दया नको माया 

जे जे नाठाळ त्यांना दे धरणी ठाय!

किती आले करुन गेले वायदा

डोळ्यांवर पट्टी बांधून उभा आंधळा कायदा

आपण होऊ दुर्गा चंडी कालिका

नराधमांना लावू शिवकायदा

हाच ग् खरा न्याय...

संपवू आता आपण ! 

आपुल्यावरचा अघोरी अन्याय!


© पुष्पा पटेल " पुष्पम् "

देवा...

देवा,एक धागा सुखाचा  तू दिला रे माझ्या हाती उजेड देण्या सृष्टीला... वळीन मी जन्मभर वाती © सौ.पुष्पा पी.पटेल