Followers

शनिवार, फेब्रुवारी १९, २०२२

जय शिवराय !


जय  भवानी  जय  शिवाजी
हाक ऐकताच उठे गात्रात शिरशिरी !
शिवराजे ! भूपती,अश्वगजपती गडपती
प्रौढप्रतापपुरंदर, सिंहासनाधीश्वर
स्वराज्यस्थापक प्रजापती
तेज:पुंज न्यायाधिपती
शिवराजे शब्दही थिटे हो..
तुमच्या कर्तृत्वापुढती !
आज या पावन दिनी
गाते मी तेजाची आरती !

जयंती पर्वाला शिवरायांना विनम्र अभिवादन 🙏🌹🌹🙏

©®सौ.पुष्पा पटेल "पुष्पम्"

बुधवार, फेब्रुवारी १६, २०२२

शिल्प हे जीवनाचे !

आई-बाबा माझे विठ्ठल-रखुमाई
जन्मदाते ते ऋणाईत मी कशी होऊ उतराई
मला घडविण्या केले कष्ट अपार
काया वाचा मने रिझवूनी केले संस्कार
माणुसकी, विश्वास अन् समर्पण
शिकले मी त्यांचा सावलीत छान
स्वतः काट्याची तुडवली वाट
दिला आम्हा भावंडांना समृद्धीचा पाट
तू समर्थ हो बाळा...मी आहे तुझ्या पाठीशी !
हरायचं नाही कधी...धैर्याने लढ संकटांशी !
हे त्यांचे धीराचे बोल
होऊच शकत नाही त्या शब्दांचे मोल
आहेत न्...ते अनमोल !
आई-बाबांचा आदर्शाची शिदोरी
जपलीय बरं मी हृदयाशी
आजी-आजोबा तर माझे जीव की प्राण
त्यांचा प्रेमापुढे तर गगनही वाटे ठेंगणं
अशा भरल्या घरात जन्म माझा झाला
शिकून खूप मोठी हो आशीर्वाद मज मिळाला.
कुलस्वामिनी कृपेने जुळले संबंध सर्वोत्तम अशा पुरुषोत्तमाशी!
अठ्ठावीस वर्षाच्या सहवासात
मैत्री झाली अक्षरांशी...
समजावली त्यांनी मला
साहित्य...लेखनकला
तन-मन आणि अक्षरधनाशी
जणू बांधली रेशीमगाठ
आज चालतेय मी...साहित्याची अवघड वाट...
भेटली माय माझी सरस्वती ! म्हणाली, घे तू लेखनी हाती 
आज तिच्या प्रसादे झाले मी सारस्वत !
जन्मते कविता ! शब्दापुढती अर्थ  अर्थासवे घेऊन सूर 
कवितेच्या प्रांतात ऐकते मी नाव...
गोड चर्चा होते माझी सर्वदूर !
आई-बाबांचा आठवणी शिवाय माझी उजाडत नाही पहाट
जन्मोजन्मी अशीच घट्ट राहो मातृ-पितृत्व गाठ!

©®सौ. पुष्पा पटेल "पुष्पम्"
मु.पो.म्हसावद.ता.शहादा.
जि.नंदुरबार.

मंगळवार, फेब्रुवारी १५, २०२२

स्वप्नात मी...!

पहाटे पहाटे स्वप्न मज पडले

स्वप्नात अवचित मज पंख फुटले 

घेतली  गरुडापरी  झेप  मी

उंच आकाशी चहूदिशी विहरले


गिरीशिखर मी जाऊन आले

सागर तटाकी मी न्हावून आले

मानस सरोवरी राजहंसास भेटून आले

स्वप्न माझे असे अनोखे...

सुख संतोष मज देऊन गेले !


©® सौ.पुष्पा पटेल " पुष्पम् "



सोमवार, फेब्रुवारी १४, २०२२

क्षण प्रीतीचा

सख्या, हृदयाचा  कोंदणात
दरवळ तुझ्याच प्रीतफुलाचा
अलगद ओढून घे  तू मिठीत
भिजवून टाक क्षण आनंदाचा!

©®सौ.पुष्पा पटेल "पुष्पम्"

शनिवार, फेब्रुवारी १२, २०२२

जीवलगा!



जीवलगा, तुझं अन् माझं नातं
"दो जिस्म एक जान है हम"

तू जिव्हाळा मी आपलेपण
तू विश्वास मी समर्पण

तू दिवा तर मी वाती
तू दिस अन् मी राती

तू  रत्नाकर मी सरिता
तू पाणी मी झरा वाहता

तू श्वास अन् मी आस
तू स्वप्न तर मी आभास

तू जीवनगाणे मी तराणे
तू चंद्र अन् मी चांदणे

तू क्षीरोदधि मी नीर
तू हृदय अन् मी शिर

कसे म्हणू मी हे वेगळे
हे बंध रेशमाचे जगावेगळे !


©®सौ. पुष्पा पटेल " पुष्पम् "
       मु.पो.म्हसावद

मंगळवार, फेब्रुवारी ०८, २०२२

पहिलं प्रेम!

पहिल्या  प्रेमाची  गोष्टंच  न्यारी
देते ती आपल्याला फिलींग भारी
नव्या नवलाईची असते मज्जा खरी
करून आणते  कल्पनेची  भरारी!

पहिल्या प्रेमाची गोष्टंच न्यारी
कुरुपही दिसते  स्वर्गाची परी
तिच्या पेक्षा  हीच वाटते बरी
मनातच  म्हणतो,"लई  भारी"👌

©® सौ.पुष्पा पटेल "पुष्पम्"


रविवार, फेब्रुवारी ०६, २०२२

माझी शब्दप्रीत...

वाटतं तितकं सोपं नाही बरं
गृहिणीला कवयित्री बननं
लाटणं असणा-या हातात लेखणी धरणं
अडचणी अनेक पण् ध्यास मात्र एक
कोंडलेल्या भावना कागदावर उतरवणं
कितीतरी चांगले विचार...
गरम फोडणीत मिक्स होतात 
कधी मिक्सरचा पात्यांमध्ये भरडले जातात
कधी कणिक मळतांना मळले जातात...
कधी साखरेचा पाकात अलगत घोळले जातात
अगदी सहजच...
तरीही ती धडपडते लिहायला
सोसलेलं,घेतलेलं,अनाहूत मिळालेले...
सुख कमी पण दुःख जास्त
मनाच्या कप्प्यात हृदयाच्या मलमली गाठोड्यात बांधलेले सगळं शब्दगंधाने परत द्यायला !
अनुभवलेलं विचार लेखनीतून मांडायला!
कधी यजमानांचा मार्गदर्शनाने
कधी समाजाच्या वर्तुळ परीघात राहून...
झटकून टाकते; लेखणीतील शाई झटकून टाकावी तसे...
मनातले मळकट दौर्बल्य एकेक अक्षरांनी उतरवते कागदावर !
धैर्याने...लढते प्रत्येक वळणावर... 
होते रणरागिणी वेळ आल्यावर 
स्वतःचे अनुभव सामर्थ्य घेऊन
 जन्मते तीची कला अष्टही आघाड्यांवर
 लढते ती होऊन नवदुर्गा!
विचार खड्गांचा खणखणाटातून दशदिशांना मग तिचाच बोलबाला !
©® पुष्पा पटेल " पुष्पम् "

ओल्या सांजवेळी!

सख्या ओल्या सांजवेळी  मन माझे हिंदोळ्यावर झुले  तू येण्याची चाहूल लागताच  हृदयी माझ्या वसंत फुले  सख्या ओल्या सांजवेळी  नजर माझी...