सख्या ओल्या सांजवेळी
मन माझे हिंदोळ्यावर झुले
तू येण्याची चाहूल लागताच
हृदयी माझ्या वसंत फुले
सख्या ओल्या सांजवेळी
नजर माझी तुझ्यात गुंतते
तुझ्या रे गोड मिठीत
स्वर्गसुख मज ते भेटते
सख्या ओल्या सांजवेळी
उन्हे बघ कशी परतली
तुझ्या स्पर्शात जणू ती
उब हवीशी मला मिळाली
©®सौ पुष्पा पी पटेल "पुष्पम् "
अप्रतिम शब्दसौदर्याने नटलेले काव्य ✍️👌
उत्तर द्याहटवाखुप छान लिहिलय ताई
उत्तर द्याहटवावाँव खूप छान लिहलस...छान छान उपमा दिल्यास..मस्तच काव्यरचना....पुष्पा भोसले
उत्तर द्याहटवामॅडम, हा तर खूप सुंदर रचनाविष्कार ✍️👌
उत्तर द्याहटवा