"दो जिस्म एक जान है हम"
तू जिव्हाळा मी आपलेपण
तू विश्वास मी समर्पण
तू दिवा तर मी वाती
तू दिस अन् मी राती
तू रत्नाकर मी सरिता
तू पाणी मी झरा वाहता
तू श्वास अन् मी आस
तू स्वप्न तर मी आभास
तू जीवनगाणे मी तराणे
तू चंद्र अन् मी चांदणे
तू क्षीरोदधि मी नीर
तू हृदय अन् मी शिर
कसे म्हणू मी हे वेगळे
हे बंध रेशमाचे जगावेगळे !
©®सौ. पुष्पा पटेल " पुष्पम् "
मु.पो.म्हसावद
खुपच सुंदर शब्दरचना 👌👌👌✍️✍️🙏🏼🙏🏼💐💐
उत्तर द्याहटवाअप्रतिम शब्दभावना!✍️👌👌👌
उत्तर द्याहटवाअप्रतिम रचना 👌👌👌
उत्तर द्याहटवावाहहह... ह्रदयस्पर्शी काव्यरचना....अप्रतीम शब्दांकन....👌👍💐🍫
उत्तर द्याहटवासुंदर कविता
उत्तर द्याहटवाखूपच छान 👌
उत्तर द्याहटवाखूप खूप सुंदर
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर रचना 👌👌👌
उत्तर द्याहटवा