Followers

मंगळवार, ऑक्टोबर २६, २०२१

भीती


भीती  कधीच  जवळ   नका  करु
ती नाहीच ! तिला  नाव  नका  देऊ
आहे जे ते खणखणीत बोलत चला
विनाकारण कुणाला भिती नका दाऊ

भीती ... समजा तिला एक मृगजळ
जे अंतर्मनाला आपुल्या घाली भूरळ
भल्याभल्यांना  हो  ती  गारद  करते 
मल्ल  असो  वा  कुणी  हिरावते बळ!

© पुष्पा पटेल " पुष्पम् "

सोमवार, ऑक्टोबर २५, २०२१

समृद्ध

उदंड   कष्ट  करून  सख्या...
दिला जीवनाला निश्चित साज
मी   ही  केला  संसार  नेटका
म्हणून  समृद्ध आहोत रे आज

© पुष्पा पटेल " पुष्पम् "

दास्तां

अपने प्यार की दास्तां
खूप अनोखी आहे सजना
सैय्या जनमजनम का हैं रिश्ता 
बंध हे रेशमाचे काही केल्या सुटेना

© पुष्पा पटेल " पुष्पम् "

रविवार, ऑक्टोबर २४, २०२१

प्रेमाचं पान

हृदयरुपी वहीत मी जपलयं
आपल्या प्रेमाचं एक पान
निर्मळ आहे रे  मन  माझे
सख्या हृदयातुन तू ते जाण...

© पुष्पा पटेल "पुष्पम्"

दयाळा

साथ आहे तुझी दयाळा
म्हणून मी आनंदी आहे
तुच रे माझा जगजेठी
तुच माझा पालनकर्ता
अशीच असू दे कृपा तुझी
देई मज आशीष सुखकर्ता
देवा तुझा विसर न व्हावा!

© पुष्पा पटेल "पुष्पम्"

शनिवार, ऑक्टोबर २३, २०२१

बलमा (भूलोळी)



मेरे मनमंदिर में
सख्या फक्त तुझीच रे मूर्ती
तेरी मोहब्बत हूॅंं रे मैं बलमा
जन्मोजन्मी देऊ जगी प्रेमाची प्रचिती

© पुष्पा पटेल " पुष्पम् "

भरारी

लढेन पण हार मानणार नाही
भूतकाळ  बघायचा कशाला ?
कात टाकून  घेईन उंच भरारी
भविष्य मी  सुरक्षित करायला

© पुष्पा पटेल "पुष्पम्"

ओल्या सांजवेळी!

सख्या ओल्या सांजवेळी  मन माझे हिंदोळ्यावर झुले  तू येण्याची चाहूल लागताच  हृदयी माझ्या वसंत फुले  सख्या ओल्या सांजवेळी  नजर माझी...