पायी तुटके चपला घालून
बाळाचे लाड पुरवितो तो ...बाप !
बाहेरून वाटतो नारळासारखा कठोर
पण् आतून खोब-यासारखा मऊ गोड असतो तो...बाप!
" तू फक्त शिक आणि मोठा हो.
बाकीचे मी बघून घेईन !"असं
धीराने म्हणणारा ...बाप !
स्वतः मौजमजा विसरून झटतो
मुलाबाळांचा हट्ट पुरवण्यासाठी
जन्मभर राबतो तो ...बाप !
स्वतः पोटाची भूख मारुन
मुलाची भरमसाठ काॅलेज फी भरतो तो... बाप !
प्रसंगी रागावून कोपऱ्यात एकटाच पश्चात्ताप करणारा तो... बाप !
मुलीला सुख-संपन्नतेचे सासर मिळावं म्हणून उन्हा-तान्हात भटकंती करणारा तो...बाप !
पाठवणी करतांना " लेक नाही काळजाचा तुकडा हाय! जपा हो तिला!" म्हणून हात जोडून व्याही मंडळींना विनंती करणारा तो...बाप !
डोळ्यात रग आणि हृदयात प्रेम जपणारा तो...बाप !
चंदनासारखा झिजून कुटुंबावरी मायेचे सुगंधी लिंपन करतो तो... बाप
बाप तोलतो घराचा भार !
बाप असतो घराचा आधार !
बाप असतो दिलाने उदार
संकटे कितीही येवो होत नाही लाचार तो...बाप !
बाप...वटवृक्षाची सावली
बापातच दिसते मला विठाई माऊली !
©® पुष्पा पटेल " पुष्पम् "
मु.पो.म्हसावद