निश्चयाने दोहोंनी हाती
अज्ञानाच्या तिमिरात चमकले
ज्ञानसूर्य होऊन सावित्री-ज्योती
सावित्रीच्या हस्ते रचली
स्री-शिक्षणाची मुहूर्तमेढ
सनातनींंना न घाबरता
मोडीली कर्मठतेची तेढ
रांधा वाढा उष्टी काढा
तोडिल्या परंपरेच्या भींती
ज्ञानार्जनाचा वसा घेऊन
लेकींना दिली अक्षर नीति
ज्योती-सावित्रीच्या कष्टातून
फुलले अनंत ज्ञानाचे मळे
वाहते मी आज कृतज्ञतेने
कोटी कोटी पुष्पांची दळे
सत्यशोधक, महान समाज
सुधारक ज्योतीबा फुलेंना
🙏🌹शतकोटी प्रणाम ! 🌹🙏
©®सौ.पुष्पा पटेल "पुष्पम्"
मु.पो.म्हसावद
खूप खूप मस्त रचना अप्रतिम...
उत्तर द्याहटवा✍️✍️👌👌👌अतिशय सुंदर रचना
उत्तर द्याहटवाअप्रतिम शब्दसौदर्य!✍️👌👌👌
उत्तर द्याहटवाज्ञानज्योतींबांना विनम्र अभिवादन!💐🙏🙏🙏
🙏
उत्तर द्याहटवाफारच सुंदर रचना 👌🏻👌🏻👌🏻
उत्तर द्याहटवाअप्रतिम 👌🏻👌🏻
उत्तर द्याहटवाखूपचं सुंदर रचना....✍️👍👌🍫
उत्तर द्याहटवा