Followers

सोमवार, ऑक्टोबर २५, २०२१

समृद्ध

उदंड   कष्ट  करून  सख्या...
दिला जीवनाला निश्चित साज
मी   ही  केला  संसार  नेटका
म्हणून  समृद्ध आहोत रे आज

© पुष्पा पटेल " पुष्पम् "

दास्तां

अपने प्यार की दास्तां
खूप अनोखी आहे सजना
सैय्या जनमजनम का हैं रिश्ता 
बंध हे रेशमाचे काही केल्या सुटेना

© पुष्पा पटेल " पुष्पम् "

रविवार, ऑक्टोबर २४, २०२१

प्रेमाचं पान

हृदयरुपी वहीत मी जपलयं
आपल्या प्रेमाचं एक पान
निर्मळ आहे रे  मन  माझे
सख्या हृदयातुन तू ते जाण...

© पुष्पा पटेल "पुष्पम्"

दयाळा

साथ आहे तुझी दयाळा
म्हणून मी आनंदी आहे
तुच रे माझा जगजेठी
तुच माझा पालनकर्ता
अशीच असू दे कृपा तुझी
देई मज आशीष सुखकर्ता
देवा तुझा विसर न व्हावा!

© पुष्पा पटेल "पुष्पम्"

शनिवार, ऑक्टोबर २३, २०२१

बलमा (भूलोळी)



मेरे मनमंदिर में
सख्या फक्त तुझीच रे मूर्ती
तेरी मोहब्बत हूॅंं रे मैं बलमा
जन्मोजन्मी देऊ जगी प्रेमाची प्रचिती

© पुष्पा पटेल " पुष्पम् "

भरारी

लढेन पण हार मानणार नाही
भूतकाळ  बघायचा कशाला ?
कात टाकून  घेईन उंच भरारी
भविष्य मी  सुरक्षित करायला

© पुष्पा पटेल "पुष्पम्"

शुक्रवार, ऑक्टोबर २२, २०२१

प्रियतमा

प्रियतमा...
तुझ्या  संदेशा आला की
मनमयूर हा नाचे थुईथूई
आनंद  होई  माझ्या उरी
उत्तर  हे देण्या  होई घाई

सखी...
कसे  ग् सांगू  वेडे मन हे 
भेटाया तुला अधीर  होई
टाइप होई भलतंच काही 
तुला पाहता मी तृप्त होई

© पुष्पा पटेल " पुष्पम् "

देवा...

देवा,एक धागा सुखाचा  तू दिला रे माझ्या हाती उजेड देण्या सृष्टीला... वळीन मी जन्मभर वाती © सौ.पुष्पा पी.पटेल