Followers

रविवार, डिसेंबर १२, २०२१

संकल्प

संकल्प केलाय  हो मी !
घाम गाळीन  स्वकमाई करेन
नाही करणार कोणाची हाजी
स्वाभिमानाने मी जगेन !

© पुष्पा पटेल " पुष्पम् "

शनिवार, डिसेंबर ११, २०२१

आनंदे जगू

जीवन फक्त एकदाच मिळते
व्देष  मत्सर  हा बाजूला ठेवू
प्रेमाने  आणि  आनंदाने जगू
राग नको मानवता जागी ठेवू

© पुष्पा पटेल " पुष्पम् "

शुक्रवार, डिसेंबर १०, २०२१

मौनंम्


मौनंम्   सर्वार्थ   साधनम् !
म्हटले  समाज  धुरीणांनी
उगीच नाही  हो  ही उक्ती
प्रचलित केली  ती सर्वांनी 

© पुष्पा पटेल " पुष्पम् "


गुरुवार, डिसेंबर ०९, २०२१

सुखी सहजीवनाचे सूत्र

सख्या रे...
तोंडात साखर अन् डोक्यावर बर्फ
ठेवलाय की रे  मी आधीच !
सुखी सहजीवनाचे हे खरे सूत्र
संसारी होत नाही वाद-विवाद
कधीच !

© पुष्पा पटेल "पुष्पम्"

बुधवार, डिसेंबर ०८, २०२१

हे दयाळा


अडकवू नको देवा जन्मफे-यात मला
स्वार्थी या जगात मिळे मज उपहास

असह्य होती मज अशा ह्या गोष्टी
देवा लागू दे मना तुझ्या नामाचा ध्यास

आवडते तूज ते !  दिले मी तुला खास 
चरणी तुझ्या मिळो जागा हीच मज आस !

© पुष्पा पटेल "पुष्पम्"

मंगळवार, डिसेंबर ०७, २०२१

सवय


कितीदा तुला सांगावे
मला काहीच कळेना
उशिरा उठायची सवय
तुझी जाता जाईना
"लवकर निजे लवकर उठे
त्यासी ज्ञानसंपत्ती भेटे"
हा मंत्र तू अंमलात आणना!

© पुष्पा पटेल "पुष्पम्"

सोमवार, डिसेंबर ०६, २०२१

निष्काम भक्ती


आहे हो  कृपा  भगवंताची
केली   मी  भक्ती  निष्काम
स्वतःचे असे काही  मिळावे
म्हणून केले  निष्ठेने मी काम!

© पुष्पा पटेल "पुष्पम्"

देवा...

देवा,एक धागा सुखाचा  तू दिला रे माझ्या हाती उजेड देण्या सृष्टीला... वळीन मी जन्मभर वाती © सौ.पुष्पा पी.पटेल