Followers

मंगळवार, नोव्हेंबर ०९, २०२१

तुझी कृपा राहो!

तुझे  नाम आळविता आई
क्षणभर दुःख  मी  विसरते

क्लेश  सारे   गळून  पडती
आनंदसागरी  मी  हो डुंबते

अशीच कृपादृष्टी ठेव जगदंबे
मी नमन तुज साष्टांग  करीते🙏🙏

© पुष्पा पटेल " पुष्पम् "

सोमवार, नोव्हेंबर ०८, २०२१

असावा सांगाती

तुझा विसर न व्हावा देवा !
केला मी सत्याचा अट्टाहास

दूर ठेव तम ने तू प्रकाशदिशी 
असू दे तुझा कायम सहवास

कलह क्लेशासी ठेवावे तू दूर
जेथे जाईन तेथे असू दे तुझा वास

© पुष्पा पटेल " पुष्पम् "

रविवार, नोव्हेंबर ०७, २०२१

जाणीव

चंद्र जरी झाकोळला
जाणीव ती चांदणीला
मनात तिच्या कृतज्ञता
आहे भान त्या वेडीला

© पुष्पा पटेल "पुष्पम्"

शनिवार, नोव्हेंबर ०६, २०२१

प्रिय बालपण

प्रिय मला  माझं  बालपण
त्यात न  कुठले अहंमपण
निर्मळ  निरागस  गोडपण
केली मज्जा, मस्ती, खेळणं
क्षणात भांडण न् क्षणात गट्टी
अनुभवले मी माझे बालपण

© पुष्पा पटेल "पुष्पम्"

शुक्रवार, नोव्हेंबर ०५, २०२१

विसर ते सारे!

झालं गेलं विसरून 
गोड मानून घ्यायचंं!

जीवन खळाळता झरा
आनंद घेत जगायचं!

मन मारत जगण्यापेक्षा
हसत खेळत रहायचं!

© पुष्पा पटेल "पुष्पम्"

दिवाळी पाडवा

तेजोमय   झाला  आजचा  दिनू
प्रकटली   हो  माझी   गृहलक्ष्मी
अंधारातून नेई मज प्रकाशदिशी
अशी  दिव्यत्व माझी अष्टलक्ष्मी !

आज  नववर्ष   दिवाळी  पाडवा
साडेतीन  मुहूर्तांत  एक   पवित्र
टळो    इडा   पिडा   जळो  दैन्य
नांदु दे भूवरी बळीराजाचे राज्य!

🪔 दिवाळी पाडवा आणि नववर्ष
 [ विक्रम संवत-२०७८] हार्दिक शुभकामना!🪔 

© पुष्पा पटेल " पुष्षम् "

गुरुवार, नोव्हेंबर ०४, २०२१

शुभ दिपावली

आली आली शुभ  दिपावली
दारी लक्ष लक्ष दिप उजळती

अंधार हा मनीचा नष्ट करुनी 
हृदयी  आनंद फुले  उमलती

करा सौख्य समृद्धीचा फराळ
गृहलक्ष्मी घरी आनंद फुलवती

© पुष्पा पटेल " पुष्पम् "

देवा...

देवा,एक धागा सुखाचा  तू दिला रे माझ्या हाती उजेड देण्या सृष्टीला... वळीन मी जन्मभर वाती © सौ.पुष्पा पी.पटेल