Followers

शनिवार, ऑक्टोबर ०९, २०२१

राजा राणी

धडकन मेरी बोले
तू माझा राजा मी तुझी राणी
चाहत मेरी तेरे प्यार की प्यासी
घे ना राजा मीठीत बाहू तुझे खोलूनी

© पुष्पा पटेल " पुष्पम् "

शुक्रवार, ऑक्टोबर ०८, २०२१

ऐक ना! [ त्रिवेणी रचना ]

💎 त्रिवेणी -१

खूप काही  आहे  तुला  सांगण्यासाठी
पण् वेळ कुठे तुझ्याकडे ऐकण्यासाठी?
माझं म्हणणं  ऐक  ना  क्षणभरासाठी..!

  ❤️         🌷         💘       🌹

💎 त्रिवेणी -२

तुला  पाहिले  अन्  मी   कल्पनेत न्हाले 
शब्दसुमने  गुंफून  काव्यमाला   बनविले
तुझ्या सुरांत सूर मिसळून अभंग गायीले

© पुष्पा पटेल " पुष्पम् "

हास्य (भूलोळी रचना)

तेरी सुंदर मुस्कान 

🌹             ❤️

गाली तुझ्या चंद्राची खळी ग्

🌙         🌕          💎

ओठोकी लाली जैसी गुलाब कली

🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌹

प्रितभूंगा  हा  हृदय  घायाळ  करी  ग्

🐝  ❤️   🌈    🐝   💞.     💘

© पुष्पा पटेल " पुष्पम् "

गुरुवार, ऑक्टोबर ०७, २०२१

मोतीयाची लगड

रे मनुवा...
💫   💫.  💫
समाधान ठेवशील  हृदयी तर
अंतरीचे सुख मोत्यांची लगड

🌹. 💞. 🌹. 💞. 🌹

दूरवर भासे ते साजीरे गोजीरे
अन् जवळून दिसे ओबड धोबड

© पुष्पा पटेल " पुष्पम् "

ऋणानुबंध

नातं तुझं नि माझं आहे जन्मोजन्मीचे
अलगद जूळनी आले बंध रेशमाचे

❤️🌹🌹💞🌹🌹💞🌹🌹❤️

त्या पल्याड जाऊन संबंध ते प्रीतीचे
जपले मी त्यासी ऋणानुबंध हे प्रेमाचे

❤️🌹🌹💞🌹🌹💞🌹🌹❤️

© पुष्पा पटेल " पुष्पम् "

बुधवार, ऑक्टोबर ०६, २०२१

प्रितवेळ

ती
वेळ
खूपच
अप्रतिम
होती रे तुझा
माझा त्या प्रेमाची
मौल्यवानच 
रे घटीका
होतीच 
मस्त
ती

© पुष्पा पटेल
      "पुष्पम"

चित्तचोर (शंकरपाळी काव्य)

हे
देवा
श्रीहरी
चित्तचोर
शामसुंदर
देवकीनंदना
द्वारकेचा तू राणा
सुदर्शन   चक्रधारी
प्रणत क्लेशनाशना
नंदनंदन  गोपाला
राधामनमोहना
कमलनयन
कंजलोचन
नारायण
गोविंद
कृष्ण
श्री
🌹🙏🌹

© पुष्पा पटेल " पुष्पम् "


देवा...

देवा,एक धागा सुखाचा  तू दिला रे माझ्या हाती उजेड देण्या सृष्टीला... वळीन मी जन्मभर वाती © सौ.पुष्पा पी.पटेल