Followers

वेळ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
वेळ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, ऑक्टोबर ०८, २०२१

ऐक ना! [ त्रिवेणी रचना ]

💎 त्रिवेणी -१

खूप काही  आहे  तुला  सांगण्यासाठी
पण् वेळ कुठे तुझ्याकडे ऐकण्यासाठी?
माझं म्हणणं  ऐक  ना  क्षणभरासाठी..!

  ❤️         🌷         💘       🌹

💎 त्रिवेणी -२

तुला  पाहिले  अन्  मी   कल्पनेत न्हाले 
शब्दसुमने  गुंफून  काव्यमाला   बनविले
तुझ्या सुरांत सूर मिसळून अभंग गायीले

© पुष्पा पटेल " पुष्पम् "

देवा...

देवा,एक धागा सुखाचा  तू दिला रे माझ्या हाती उजेड देण्या सृष्टीला... वळीन मी जन्मभर वाती © सौ.पुष्पा पी.पटेल