Followers

बुधवार, ऑक्टोबर ०६, २०२१

प्रितवेळ

ती
वेळ
खूपच
अप्रतिम
होती रे तुझा
माझा त्या प्रेमाची
मौल्यवानच 
रे घटीका
होतीच 
मस्त
ती

© पुष्पा पटेल
      "पुष्पम"

चित्तचोर (शंकरपाळी काव्य)

हे
देवा
श्रीहरी
चित्तचोर
शामसुंदर
देवकीनंदना
द्वारकेचा तू राणा
सुदर्शन   चक्रधारी
प्रणत क्लेशनाशना
नंदनंदन  गोपाला
राधामनमोहना
कमलनयन
कंजलोचन
नारायण
गोविंद
कृष्ण
श्री
🌹🙏🌹

© पुष्पा पटेल " पुष्पम् "


मंगळवार, ऑक्टोबर ०५, २०२१

आधारवड

कधीच नाही अडवलं मला
' करुन बघ ना, तुला जमेलच ! '
म्हणून तू पाठीशी उभा रहातो
राजा, किती मोठं मन आहे तुझं 
कायम मला तुझा अभिमान वाटतो
मी उभी आहे आज झटकून हे ओझं

© पुष्पा पटेल " पुष्पम् "

मोहब्बत (भूलोळी)

मोहब्बत हूॅंं मैं तेरी
प्रितीचा लळा लाविला मला
दिल तेरे नाम कर बैठी प्यारे 
काही कळेना मज सर्वस्व दिले तुला

© पुष्पा पटेल " पुष्पम् "

सोमवार, ऑक्टोबर ०४, २०२१

शोधू कुठे?

शोधु मी कुठे
नव्हते आपुले ते
कधीही नाते 

कसे ठेवू रे
नाव मी त्या नात्याला
अनामिकाला


© पुष्पा पटेल " पुष्पम् "

आई-बाबा

माझे आई बाबा...मज
ब्रम्हा विष्णू आणि महेश
माझ्या चित्ती सदा त्यांचा भाव
जणू वाटे मज जन्माचे ईश 

आई बाबांची मज शिकवण
प्रामाणिक राहून प्रयत्न करा
संकटे आलीत जरी कितीही
प्रभू नामाची कास धरा


© पुष्पा पटेल " पुष्पम् "

शनिवार, ऑक्टोबर ०२, २०२१

उर्वशी (भूलोळी)

सजनी,तेरी ये अदा
खरंच की ग् जगावेगळी
सितारोंकी रौनक भी फिकी लगे
रंभा  उर्वशी  वाटे  तुझ्यापुढे  दुबळी


© पुष्पा पटेल " पुष्पम् "

देवा...

देवा,एक धागा सुखाचा  तू दिला रे माझ्या हाती उजेड देण्या सृष्टीला... वळीन मी जन्मभर वाती © सौ.पुष्पा पी.पटेल