माझं माहेर हो गोड
गाऊ किती गुणगान
माहेर शब्द उच्चारता
विसरते मी देहभान
माझं माहेर जणू
मायेचं साजूक तूप
आईबाबांचा प्रेमाचं
आहे अनमोल रुप !
माझ्या माहेराची गोडी
बहू अविट अविट
माहेरचा वाटेवर
सोन्या चांदीचे हो पाट
माझ्या माहेरची गाणी
गातो स्वर्गीचा गंधर्व
माहेराची जन्मकथा
भाट पोथीचा संदर्भ
माहेरची सय येता
मनी भेटीची हूरहूर
आई बाबांना बघण्या
जीव होई अनावर !
असं माझं माहेर
सुखाचं हो आगर
आनंदाचा वाहे झरा
मायेचा ते सागर!
©®सौ पुष्पा पटेल "पुष्पम्"
Mast kavita Tai!!!
उत्तर द्याहटवाखूप खूप धन्यवाद 🙏😊
हटवाअप्रतिम
उत्तर द्याहटवाtrue
उत्तर द्याहटवाखुप सुंदर रचना 👌👌💐💐💐
उत्तर द्याहटवाखुप सुंदर रचना माहेर ची सर कशालाच नसते
उत्तर द्याहटवाखूप छान ताई
उत्तर द्याहटवाअप्रतिम रचना आणि ती ही माहेरची त्यामूळे त्यातील भावना ठळकपणे जाणवतात खुप खुप सुंदर
उत्तर द्याहटवा