Followers

मंगळवार, डिसेंबर २०, २०२२

माझं माहेर !

माझं  माहेर  हो गोड
गाऊ  किती गुणगान
माहेर शब्द उच्चारता
विसरते  मी  देहभान

माझं   माहेर  जणू 
मायेचं साजूक  तूप
आईबाबांचा प्रेमाचं
आहे अनमोल रुप !

माझ्या माहेराची गोडी
बहू  अविट अविट
माहेरचा    वाटेवर
सोन्या चांदीचे हो पाट 

माझ्या माहेरची गाणी
गातो  स्वर्गीचा गंधर्व
माहेराची  जन्मकथा
भाट  पोथीचा संदर्भ

माहेरची  सय  येता
मनी  भेटीची हूरहूर
आई बाबांना बघण्या 
जीव  होई  अनावर !

असं  माझं  माहेर
सुखाचं  हो आगर
आनंदाचा वाहे झरा
मायेचा  ते  सागर!

©®सौ पुष्पा पटेल "पुष्पम्"

८ टिप्पण्या:

  1. खुप सुंदर रचना माहेर ची सर कशालाच नसते

    उत्तर द्याहटवा
  2. अप्रतिम रचना आणि ती ही माहेरची त्यामूळे त्यातील भावना ठळकपणे जाणवतात खुप खुप सुंदर

    उत्तर द्याहटवा

ओल्या सांजवेळी!

सख्या ओल्या सांजवेळी  मन माझे हिंदोळ्यावर झुले  तू येण्याची चाहूल लागताच  हृदयी माझ्या वसंत फुले  सख्या ओल्या सांजवेळी  नजर माझी...