Followers

शनिवार, नोव्हेंबर २७, २०२१

माझं जग

नाही  राहिली  मी कधी तुझ्याविना
नोंदी ना ठेवल्या मी ह्या जगण्याचा
तुझ्या  विना नाही रे  माझं  हे  जग
प्रश्नच नाही तुझ्यापासून दूर जाण्याचा!

© पुष्पा पटेल " पुष्पम् "

शुक्रवार, नोव्हेंबर २६, २०२१

दातृत्व

देवा  तुझ्या  दातृत्वाचा
सुगावा  नाही  लागत  रे 
देतोस  तू  मज  भरभरून
समाधानाने भरून पावते रे!

© पुष्पा पटेल "पुष्पम्"

गुरुवार, नोव्हेंबर २५, २०२१

फुलवात

"कराग्रे वसते लक्ष्मी " म्हणूनी 
करते मी  दिवसाची सुरुवात
विचारांची अडगळ दूर करुन
लावते  ईशनामाची फुलवात!

© पुष्पा पटेल " पुष्पम् "

बुधवार, नोव्हेंबर २४, २०२१

रे सख्या

तुझी  सोबत  असतांना
वादळ  मनातलं  शमलं
समुद्रकिनारी  फिरतांना
सख्या मन तुझ्यातच रमलं!

© पुष्पा पटेल "पुष्पम्"

रविवार, नोव्हेंबर २१, २०२१

आठवणींची मैफिल

दिवाळसणाला यावर्षी अहोंकडून चांगली आठदिवसाची सुट्टी काढली.आणि विशेष म्हणजे त्यांनी ती का-कू न करता दिली.
"केवढा आनंद झाला म्हणून सांगू!"
घरातली कामं सगळी आटोपून आणि ह्यांच्या दोन वेळचा डब्याची सोय करून मी एकदाची निघाली माहेरी मुलाला सोबत घेऊन.
आज भाऊबीज असल्याने सगळेच एकत्र जमणार म्हणून केवढी ती आतुरता! मन अगदी वसंतात नवी पालवी फुटलेल्या वृक्षाप्रमाणे बहरलं होतं.
गाडी पटकन बाबांच्या अंगणात थांबली आणि माझी विचारांची तंद्री तुटली.मुलाने हाॅर्न वाजवताच दोघे भाचे "आत्तु आली,आत्तु आली" करत अंगणात उतरत माझ्याकडे आली.दोघांना जवळ घेत मी घरात आले.
ओसरीत मी येणार म्हणून आतुरतेने येरझारा घालणारे बाबा,आणि  माझ्या भेटीची हुरहूर लागलेली आई, कालपासून येऊन माझी वाट बघणारी बहिण, 
भाऊ , वहिनी, बहिणीच्या मुली सगळेच माझी आतुरतेने वाट बघत होते.
सगळ्यांना बघून भेटून मन अगदी प्रसन्न झाले.
सगळं कसं अगदी आल्हाददायक वातावरण होते.जेवणावळी उठल्या.आवरासावर करून आमच्या भावंडांची अंताक्षरीची मैफिल रंगली.एकापेक्षा एक जुनी गाणी गाऊन आम्ही आमच्या बालपणीच्या आठवणी जाग्या करीत होतो.बालपणातही आम्ही असेच खेळ खेळायचो.तेव्हाचे ते दिवस,प्रसंग, हास्यकल्लोळ झाडपानातून सूर्यकिरणांच्या कवडसा यावा.तशा मनाच्या कोनाडयातून बाहेर पडत होते. 

© पुष्पा पटेल " पुष्पम् "

शनिवार, नोव्हेंबर २०, २०२१

वीण नात्यांची

नात्याची वीण घट्ट आहे माझी
वादाला माझ्या घरी नसे थारा
आनंदाला फक्त  घालते वारा

© पुष्पा पटेल "पुष्पम्"

गुरुवार, नोव्हेंबर १८, २०२१

प्रीतकाव्य

पुन्हा एकदा सांग  ना  सख्या
तुझ्या   प्रीतीची  रीतच  न्यारी
मनातलं तुझ्या ओळखायचं कसं
करतो तू प्रीतकाव्य लईच भारी!

© पुष्पा पटेल "पुष्पम्"

ओल्या सांजवेळी!

सख्या ओल्या सांजवेळी  मन माझे हिंदोळ्यावर झुले  तू येण्याची चाहूल लागताच  हृदयी माझ्या वसंत फुले  सख्या ओल्या सांजवेळी  नजर माझी...