Followers

मंगळवार, ऑक्टोबर १९, २०२१

तन-मन [भूलोळी]

तेरे दिल के पास हूॅंं
श्वासात माझ्या तू साजना रे
एक-दूजे के बिना ना कोई भोर
तुझ्याचसाठी तन-मन झिजविन रे

© पुष्पा पटेल " पुष्पम् "

रे जगजेठी

देवा...! जीवन तुच दिले रे मला 
आनंदही तूच दिला हो मला 

तिमिर घालविण्या दिली दृष्टी
तुझ्या कृपाबळे पाहते रुप तुझे
अन् पाहते तुझी कला आणि सृष्टी

क्लेशाला येथे नसे रे जागा
आयुष्याचा वस्राला तुझा प्रितीचा धागा
कवितेत माझ्या तुझीच शब्दप्रभा

आशीष तुझा सदैव असू दे जगजेठी
नमन तुला करीते मी कोटी कोटी !

[ समस्त वाचक मित्र-मैत्रीणींना " कोजागिरी पौर्णिमेच्या " महन्मंगल अमृतमय शुभेच्छा!]
🌹🌟🌕💎🌟🌕💎🌟🌕💎🌹

© पुष्षा पटेल " पुष्प "

सोमवार, ऑक्टोबर १८, २०२१

प्रीत (भूलोळी)

जी भरके भीगू सैय्या
तुझ्या प्रीतीचा गंध बेधुंद
सच्चे प्यार की हैं बात सजना
पाऊसही सरींनी टाकतो मृदगंध

© पुष्पा पटेल " पुष्पम् "

चांदण्यांची रांगोळी

सख्या आठवते का खिडकी
जिथे मी होते उभी
तू अलगद टिपली डोळ्यात
माझी सुंदर छबी !
खिडकीतून पाहता अप्रतिम भासे
निसर्गाचे उगवते सौंदर्य नभी
आभाळाच्या अंगणी
चांदण्यांची रांगोळी 
खिडकीतून रोजच पाहते मी
अन्...गार गार वारा 
तुझ्या माझ्या पहिल्या भेटीची
आठवण येता
अंगावर उभे करीतो शहारा!

© पुष्पा पटेल " पुष्पम् "

रविवार, ऑक्टोबर १७, २०२१

गालावरची खळी(भूलोळी)

रुक जावो री साजणी

पाहू दे गालावरची खळी

चाॅंद सा मुखडा है तेरा ओं प्यारी

तुझ्यासाठी आणली मी गुलाबाची कळी

© पुष्पा पटेल "पुष्पम्"

काहूर


तुझ्या शब्दसुमनांनी सख्या

काहूर मनी दाटले रे...

ऋणानुबंध हे जन्मोजन्मीचे

प्रेम हृदयी दाटले रे...

© पुष्पा पटेल "पुष्पम्"

शनिवार, ऑक्टोबर १६, २०२१

फुंकर

सख्या वेदनेला घालू हळूच फुंकर
घालू या मनाला समजूत आपण
काहूर मनात दाटले आता दुःखाचे
कुणी ना कुणाचे धिराने जगू दोघेजण

© पुष्पा पटेल "पुष्पम्"

ओल्या सांजवेळी!

सख्या ओल्या सांजवेळी  मन माझे हिंदोळ्यावर झुले  तू येण्याची चाहूल लागताच  हृदयी माझ्या वसंत फुले  सख्या ओल्या सांजवेळी  नजर माझी...