Followers

सोमवार, ऑक्टोबर १८, २०२१

चांदण्यांची रांगोळी

सख्या आठवते का खिडकी
जिथे मी होते उभी
तू अलगद टिपली डोळ्यात
माझी सुंदर छबी !
खिडकीतून पाहता अप्रतिम भासे
निसर्गाचे उगवते सौंदर्य नभी
आभाळाच्या अंगणी
चांदण्यांची रांगोळी 
खिडकीतून रोजच पाहते मी
अन्...गार गार वारा 
तुझ्या माझ्या पहिल्या भेटीची
आठवण येता
अंगावर उभे करीतो शहारा!

© पुष्पा पटेल " पुष्पम् "

१५ टिप्पण्या:

  1. खुप सुंदर ह्रदयस्पर्शी रचना.... सुंदर शब्दांकन....👌👍💐🍫

    उत्तर द्याहटवा

देवा...

देवा,एक धागा सुखाचा  तू दिला रे माझ्या हाती उजेड देण्या सृष्टीला... वळीन मी जन्मभर वाती © सौ.पुष्पा पी.पटेल