Followers
गुरुवार, ऑक्टोबर १४, २०२१
बुधवार, ऑक्टोबर १३, २०२१
बालपण
खूपच सुंदर होतेे हो तेे क्षण
आठवतं मला माझं बालपण
अल्लड अवखळ निरागस भाव
खेळता बोलता नव्हते संकोचने
मनातले मोर माझे थुईथुई नाचे
पिसारा फुलवून गाणे गुणगुणे
असं होतं बालपण खूप छान
तिथं कोणाला नसे मानापमान
© पुष्पा पटेल " पुष्पम् "
आई
त्याला फुटतात माया, ममत्व,प्रेम,जिव्हाळा
आपुलकी अशा अनंत पारंबी
आई नावाचा वटवृक्ष भूमीत उगवून आकाशाकडे झेपावला तरी,
भूमीशीच नाते सांगते पारंबी!
अगदी तसेच...
त्रिखंडात कितीही शोधली तरी
आई नावाच्या हा वटवृक्ष सापडायचाच नाही.
म्हणूनच," स्वामी तिन्ही जगाचा
आईविना भिकारी "
असं म्हणता येते.
वैज्ञानिक संशोधनानुसार वृक्ष हे दिवसा ऑक्सीजन घेतात.रात्री कार्बन डायॉक्साईडचे उत्सर्जन करतात.म्हणून रात्री वृक्षाखाली झोपू नये असे म्हणतात.
पण... वटवृक्ष हा एकच असा आहे की तो रात्री सुद्धा ऑक्सीजन(प्राणवायू) उत्सर्जित करतो.
तसेच आईचेही सांगता येईल,
ती बाळाच्या जन्मापासून ते आपल्या स्वतःच्या मृत्यू पर्यंत बाळासाठीच जगते.अगदी प्राणवायू बनून...
आईला सांभाळा! ती हरवली तर तिच्या रुपातील आपला प्राणवायू निघून जाऊ शकतो.
© पुष्पा पटेल " पुष्पम्"
म्हसावद.
मंगळवार, ऑक्टोबर १२, २०२१
अस्तित्व
थोडंस रिलॅक्स जीवन जगून बघायचं
सगळं बाजूला सारून आनंदें जगायचं
स्वतःच अस्तित्व जरा शोधून बघायचं!
© पुष्पा पटेल "पुष्पम्"
पहाटेचं स्वप्न (त्रिवेणी)
आधारवड आहे रे तू आमुचा खरा
पहाटेचं स्वप्न माझं पूर्ण होऊ दे जरा
© पुष्पा पटेल "पुष्पम्"
सोमवार, ऑक्टोबर ११, २०२१
आई जगदंबे!
भरते ग् मी तुझी ओटी !
बाळ मी अजाणता तुझी
चुकभूल माझी घाल तुझ्या पोटी
कृपा असू दे बल-बुद्धी दे !
वंदन माझे तुला कोटी कोटी!
🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻
© पुष्पा पटेल " पुष्पम् "
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
ओल्या सांजवेळी!
सख्या ओल्या सांजवेळी मन माझे हिंदोळ्यावर झुले तू येण्याची चाहूल लागताच हृदयी माझ्या वसंत फुले सख्या ओल्या सांजवेळी नजर माझी...
-
अस्तित्वाचा शोध घेतांना खाचखळग्याची वाट तुडवतांना अवचित लाभला तुझा हात विखुरलेल्या स्वप्नांची पानं धुंडाळतांना तूच दिली मज आपुलक...
-
शोधु मी कुठे नव्हते आपुले ते कधीही नाते कसे ठेवू रे नाव मी त्या नात्याला अनामिकाला © पुष्पा पटेल " पुष्पम् "
-
जय भवानी जय शिवाजी हाक ऐकताच उठे गात्रात शिरशिरी ! शिवराजे ! भूपती,अश्वगजपती गडपती प्रौढप्रतापपुरंदर, सिंहासनाधीश्वर स्वर...
-
तेरी सुंदर मुस्कान 🌹 ❤️ गाली तुझ्या चंद्राची खळी ग् 🌙 🌕 💎 ओठोकी लाली जैसी गुलाब कली 🌹🌷🌹🌷🌹...
-
प्रिये हातात हात घेऊन तू माझं जीवन ग् उजळवलेस काजव्यापरी येऊन तू माझ्या आयुष्याला प्रकाशमान केलेस प्रारंभी भासलीस ग...
-
रुठकर ना यू जावो तुझ्या प्रीतीचा लागला गंध रुक जावो दिल में भर लू तुम्हे तुझ्या रुपात भरते प्रीतीचा सुगंध! © पुष्पा पटेल ...
-
नऊ महिने पोटी माझं ओझं घेऊन वावरलीस तू आई ! तुझ्या माया- ममत्वाला त्रिभूवनी तरी उपमाच नाही तुझ्या आईपणाचा देवालाही हेवा देवही...
-
हे गजवदना । पार्वती नंदना । करीते प्रार्थना । शिवसुता ।। तू सुखकरता । तू दुःखहरता । शुभ लाभ पिता । विद्याधिशा ।। गणनायक तू । दुः...