माझं गोड बालपण
प्रेम भाव निरागस
जणू केळं शिकरण।।१।।
स्वप्न दुनियेत रमे
जणू छान परीराणी
खेळतांना गाऊ आम्ही
गोड सुमधूर गाणी।।२।।
बसायला होती एक
शुभ्र पंखांची हो गाडी
ओढायला होती छान
दोन हरणांची जोडी।।३।।
मन उद्यानी बागडे
छान ग् फुलपाखरू
सप्तरंगी दुनियेत
उडायचे भिरभिरू।।४।।
साय दुधावरची हो
आजी आजोबांची माया
प्रेम, माया सावलीत
खुलायची माझी काया।।५।।
खेळताना होत असे
आम्हा मैत्रिणींची गट्टी
धावताना पडताना
क्षणोक्षणी कट्टी बट्टी।।६।।
सरसर येता सरी
झेलायचो हातावर
पावसांत भिजतांना
हर्ष होई अनावर।।७।।
करायचो आळवणी
आम्ही भोलानाथाला
तळे साचू दे शाळेत
सुटी मिळू दे आम्हाला।।८।।
*आज येता बालदिन*
आठवलं बालपण
नेहरुंना करीते मी
विनम्रसे अभिवादन !।९।।।
©®सौ पुष्पा पटेल "पुष्पम्"
खूपच छान लिहिलंय अप्रतिम 👌
उत्तर द्याहटवाआबा 🙏
खूप खूप सुंदर लिहिले आहेत.खूप सुरेख
उत्तर द्याहटवाखुप छान रचना 👌👌👌
उत्तर द्याहटवाबालपणीच्या मलमली आठवणी अप्रतिम शब्दांत विणल्यात आपण! अप्रतिम रचनाविष्कार ✍️👌🌟🌟🌟🌟🌟
उत्तर द्याहटवा