दिपोत्सव आनंदाचा
तेजोमय प्रकाशाचा
करु साजरा आनंदे
सण महा मांगल्याचा
दिपोत्सव आनंदाचा
करु दिव्यांची आरास
लावू आकाशकंदील
शोभा आणुया घरास
आला प्रथम दिवस
संगे हो वसूबारस
गोवत्साला भरवूया
गवार भाकरी घास
येता धनत्रयोदशी
पुजा धन धन्वंतरी
आयुर्रोग्य लाभे सर्वा
तेज पसरे अंतरी
येता नर्क चतुर्दशी
प्रातः हो अभ्यंगस्नान
सडा टाकता अंगणी
शोभे रांगोळीही छान
करीता लक्ष्मीपूजन
वाढे गृहलक्ष्मी मान
धूपदिप नैवेद्याने
करु वही पूजा छान
प्रिय दिवाळी पाडवा
गृह स्वामीचे औक्षण
मिळे प्रेम स्नेह सौख्य
लाभे सौभाग्याचा दिन
भाऊबीज आनंदाची
बंध रेशमाचे अतुट
ओवाळीता बंधुराजा
जुळे नाते हो अवीट
©®सौ पुष्पा पटेल "पुष्पम्"
अप्रतिम सुंदर ताई
उत्तर द्याहटवासुंदर
उत्तर द्याहटवाखुपच सुंदर रचना अप्रतिम 👌👌👌👌🙏🏼🙏🏼
उत्तर द्याहटवासुंदर रचना
उत्तर द्याहटवाव्वा...! सुंदर रचना 👌🏻👌🏻👌🏻
उत्तर द्याहटवा