नकोय कसले ओझे माझ्या पाठी
करेन आराम,जाईल मस्त सिनेमाला
जगून तर बघू एक दिवस स्वतःसाठी
एकदिवस कामांना मारेल मी दांडी
मस्त हूंदडून खाईल चटपटीत पाणीपुरी
मैत्रीणींशी गप्पा अन् मनमुराद हसणं
आठवणीत रमून इच्छा होईल पुरी
असा हा मस्त दिवस जगायचाय मला
देवा होईल का रे पूर्ण माझी इच्छा
तूच कर काहीतरी अन् सोडव पिच्छा
तूच माझा मायबाप दे एक दिवस मज आनंदाचा!
©® सौ.पुष्पा पटेल "पुष्पम्"
तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करतील बाप्पा! अप्रतिम रचनाविष्कार मॅडमजी!✍️👌👌👌
उत्तर द्याहटवाWell said
उत्तर द्याहटवाअतिशय सुरेख रचना 👌👌👌
उत्तर द्याहटवासगळू दिवस तुमचेच आहेत, आनंदाने जगा सखी...👏👏👏
उत्तर द्याहटवा