लेक माझी हो लाडाची
राजकन्या शोभे घराची
जणू सोनपावलांनी आली
माझ्या घरी लक्ष्मी आनंदाची
लेक माझी हो खूपच शहाणी
मुखी तिच्या सावित्रीची गाणी
सर्वांशी बोले मायेने गोडगोड
एक एक शब्द अमृताची फोड
घरकामात तिचा मज मदतीचा हात
भावभक्तीने लावी देवघरात वात
अशी माझी गोडूली वाटे सोनपरी
आठवणींचे गाठोडे ठेवून नांदते सासरी
अशी लेक हो माझी भाग्याची
लेकीदिनाला आठवलं तिचं कर्तृत्व
तिचं जगणं जणू वटवृक्षाची छाया
लेकीच्या जन्माने धन्य झाले मातृत्व !
©® पुष्पा पटेल " पुष्पम् "
लेक लाडाची नीट जपावी
उत्तर द्याहटवाकरू नयेच भ्रुणहत्या कुणी
आत्मरक्षेची शिकवण द्यावी
येऊ नये तिच्या नयनी पाणी
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
✍️...🧚🏻♀️ऐंजल वैशू
(वैशाली पडवळ )
अप्रतीम रचना सखी...सुरेख शब्दांकन...👏👍💐
खुप सुंदर रचना 👌👌✍️✍️
उत्तर द्याहटवाअप्रतिम रचनाविष्कार! लेकीच्या जन्माच्या आनंद शब्दातीत!✍️👌👌👌
उत्तर द्याहटवाअप्रतिम
उत्तर द्याहटवाकृतज्ञ 🙏🙏💕💕
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर रचना👌👌👍👍
उत्तर द्याहटवालेकी असतातच गोड...खूप छान लिहिलंय ताई..🌹✍️👌👍🍫🍫🍫🍫🍫
उत्तर द्याहटवा