नागरिक भारत देशाची !!!
वारस मी भारतमातेच्या मुक्तीसाठी
प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांची...
वाचते मी गाथा त्या त्यागाची
मुक्त कराया भारतमाते
टिळा लावला रक्ताचा भाळी
तुझ्या थोर सुपूत्रांची !
जुलूमी सत्ता जाळूनी दाविला
सूर्योदय मज स्वातंत्र्याचा
करेन भारतमाते तुझी पूजा
वंदे मातरम् महा मंत्रांनी !
कथा सदैव स्मरेन मी बलीदानाची
इतिहासाच्या पानोपानी सुवर्णाक्षरे
कोरली नावे त्या समरविरांची
शिष नमवून मी करीते नमन
पावन हे भारतमाते
प्रजासत्ताक दिनी उच्चरवाने
इन्कलाब जिंदाबाद ! जय हिंद ! गाते.
प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!🌹🌹🙏🙏
©® पुष्पा पटेल " पुष्पम् "
वाहह...खुप छान व्यक्त झालात सखी...👏👏👏😍💐🍫
उत्तर द्याहटवाप्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...🇮🇳🇮🇳वंदे मातरम्🇮🇳🇮🇳
सुंदरच रचना 👌👌👌
उत्तर द्याहटवाव्वा...!खूपच छान💐💐👌👌👍
उत्तर द्याहटवामस्तच रचना 👌👌👌
उत्तर द्याहटवासुंदर शब्दभावना! ✍️👌👌👌
उत्तर द्याहटवावंदे मातरम्!🌹🙏🙏🙏