लेक माझी हो लाडाची
राजकन्या शोभे घराची
जणू सोनपावलांनी आली
माझ्या घरी लक्ष्मी आनंदाची
लेक माझी हो खूपच शहाणी
मुखी तिच्या सावित्रीची गाणी
सर्वांशी बोले मायेने गोडगोड
एक एक शब्द अमृताची फोड
घरकामात तिचा मज मदतीचा हात
भावभक्तीने लावी देवघरात वात
अशी माझी गोडूली वाटे सोनपरी
आठवणींचे गाठोडे ठेवून नांदते सासरी
अशी लेक हो माझी भाग्याची
लेकीदिनाला आठवलं तिचं कर्तृत्व
तिचं जगणं जणू वटवृक्षाची छाया
लेकीच्या जन्माने धन्य झाले मातृत्व !
©® पुष्पा पटेल " पुष्पम् "