Followers

मंगळवार, नोव्हेंबर ३०, २०२१

तुझी साहित्य संपदा


सख्या काय लिहू तुझ्यासाठी
शब्दच माझे थिटे पडले...
तरीही शब्दांना मात्र वेध 
तुझेच का रे लागलेले...
तुझी साहित्य संपदा बघुन
मन माझे तृप्त झाले...

© पुष्पा पटेल "पुष्पम्"

सोमवार, नोव्हेंबर २९, २०२१

सखा


साथ  तुझी  आहे  दयाळा
म्हणून  घेतली  उंच  भरारी
जगी  विहरते रे मी आनंदाने
तुच माझा सखा कृष्णमुरारी!

© पुष्पा पटेल "पुष्पम्"

रविवार, नोव्हेंबर २८, २०२१

अनमोल नातं

आजी नातूचं नातं म्हणजे
दुधावरची साय अनमोल!

त्यात गुरफटावं खोलवर
तेव्हा कळते त्याचे मोल!

त्यात नसतं सतावणं,रुसणं
फिरावं फक्त गोलंगोल!

© पुष्पा पटेल " पुष्पम् "

शनिवार, नोव्हेंबर २७, २०२१

माझं जग

नाही  राहिली  मी कधी तुझ्याविना
नोंदी ना ठेवल्या मी ह्या जगण्याचा
तुझ्या  विना नाही रे  माझं  हे  जग
प्रश्नच नाही तुझ्यापासून दूर जाण्याचा!

© पुष्पा पटेल " पुष्पम् "

शुक्रवार, नोव्हेंबर २६, २०२१

दातृत्व

देवा  तुझ्या  दातृत्वाचा
सुगावा  नाही  लागत  रे 
देतोस  तू  मज  भरभरून
समाधानाने भरून पावते रे!

© पुष्पा पटेल "पुष्पम्"

गुरुवार, नोव्हेंबर २५, २०२१

फुलवात

"कराग्रे वसते लक्ष्मी " म्हणूनी 
करते मी  दिवसाची सुरुवात
विचारांची अडगळ दूर करुन
लावते  ईशनामाची फुलवात!

© पुष्पा पटेल " पुष्पम् "

बुधवार, नोव्हेंबर २४, २०२१

रे सख्या

तुझी  सोबत  असतांना
वादळ  मनातलं  शमलं
समुद्रकिनारी  फिरतांना
सख्या मन तुझ्यातच रमलं!

© पुष्पा पटेल "पुष्पम्"

देवा...

देवा,एक धागा सुखाचा  तू दिला रे माझ्या हाती उजेड देण्या सृष्टीला... वळीन मी जन्मभर वाती © सौ.पुष्पा पी.पटेल