Followers

शनिवार, ऑक्टोबर २३, २०२१

बलमा (भूलोळी)



मेरे मनमंदिर में
सख्या फक्त तुझीच रे मूर्ती
तेरी मोहब्बत हूॅंं रे मैं बलमा
जन्मोजन्मी देऊ जगी प्रेमाची प्रचिती

© पुष्पा पटेल " पुष्पम् "

भरारी

लढेन पण हार मानणार नाही
भूतकाळ  बघायचा कशाला ?
कात टाकून  घेईन उंच भरारी
भविष्य मी  सुरक्षित करायला

© पुष्पा पटेल "पुष्पम्"

शुक्रवार, ऑक्टोबर २२, २०२१

प्रियतमा

प्रियतमा...
तुझ्या  संदेशा आला की
मनमयूर हा नाचे थुईथूई
आनंद  होई  माझ्या उरी
उत्तर  हे देण्या  होई घाई

सखी...
कसे  ग् सांगू  वेडे मन हे 
भेटाया तुला अधीर  होई
टाइप होई भलतंच काही 
तुला पाहता मी तृप्त होई

© पुष्पा पटेल " पुष्पम् "

संदेश

तुझ्या मॅसेज येता  साजना
मनमयुर  हा  नाचे   थुईथुई
 माझ्या उरी  आनंद मावेना
रिप्लाय देण्या झाली रे घाई!

© पुष्पा पटेल " पुष्पम् "

गुरुवार, ऑक्टोबर २१, २०२१

सत्य

गोष्ट  कोणतीही असो
वेळेवर घडायला  हवी
दिरंगाईने  का  होईना
सत्याची बाजू कळायला हवी

© पुष्पा पटेल "पुष्पम्"

हृदयी कोंदणात

तुही तो मेरी जिंदगी
ठेवलंय मी तुला मनात
मेरी हर खुशी का राज  तूंही हैं
जीवापाड जपलं  हृदयी कोंदणात

© पुष्पा पटेल "पुष्पम्"

बुधवार, ऑक्टोबर २०, २०२१

स्वाभिमान

जिथं खरं बोललेलं चालत नाही
त्याजागी जाणं माझं होत नाही
स्वाभिमान  ठेवते मनात...
मागे वळून मी बघत नाही

© पुष्पा पटेल "पुष्पम्"

देवा...

देवा,एक धागा सुखाचा  तू दिला रे माझ्या हाती उजेड देण्या सृष्टीला... वळीन मी जन्मभर वाती © सौ.पुष्पा पी.पटेल