Followers

शनिवार, ऑक्टोबर १६, २०२१

मेनका (भूलोळी)

बरसात की रात थी
प्रिये तू भिजून चिंब झाली
मुझको भाये रुप सुहाना तेरा
स्वर्गाहून जशी मेनका अवतरली

© पुष्पा पटेल " पुष्पम् "

शुक्रवार, ऑक्टोबर १५, २०२१

जीवनबाग

देवा,  श्रीरामा  मम  जीवन  बाग
बाग  आनंद  फुलांनी  उमलू  दे !
क्षणिक दुःखालाही नसावी जागा
जागा  फक्त  सुगंधा  दरवळू  दे !

🌹🌹🙏🌹🌹🙏🌹🌹

💃🏽 विजयादशमी - दसरा पावन 
सणाच्या आपणा सर्वांना मंगलमय -
शुभदायक मन:पूर्वक शुभेच्छा!
   🌹🙏❤️🙏🌹❤️🙏

© पुष्पा पटेल " पुष्पम् "

गुरुवार, ऑक्टोबर १४, २०२१

आत्मविश्वास


जिंदगी की राह पर
येतील कितीदा हो संकटे
मुश्किलोंसे मै कभी नहीं हारुंगी
आत्मविश्वासाने दूर करीन मी काटे

© पुष्पा पटेल "पुष्पम्"

आत्मविश्वास

पाऊस (हायकू )

अरे पाऊसा
चित्त तुझे ठायी रे
दे ना तू ग्वाही!

पिक शेतात
जातंय करपून
दे जीवदान

© पुष्पा पटेल " पुष्पम् "


बुधवार, ऑक्टोबर १३, २०२१

बालपण

खूपच सुंदर  होतेे  हो तेे  क्षण
आठवतं मला  माझं  बालपण
अल्लड अवखळ निरागस भाव
खेळता बोलता नव्हते संकोचने
मनातले मोर माझे  थुईथुई नाचे
पिसारा फुलवून  गाणे  गुणगुणे
असं  होतं  बालपण खूप  छान
तिथं कोणाला नसे मानापमान

© पुष्पा पटेल " पुष्पम् "

आई



 

आई हा असा वटवृक्ष आहे...
त्याला फुटतात माया, ममत्व,प्रेम,जिव्हाळा
आपुलकी अशा अनंत  पारंबी
आई नावाचा वटवृक्ष भूमीत उगवून आकाशाकडे झेपावला तरी,
भूमीशीच नाते सांगते पारंबी!
अगदी तसेच...
त्रिखंडात कितीही शोधली तरी
आई नावाच्या हा वटवृक्ष सापडायचाच नाही.
म्हणूनच," स्वामी तिन्ही जगाचा
            आईविना भिकारी "
असं म्हणता येते.
वैज्ञानिक संशोधनानुसार वृक्ष हे दिवसा ऑक्सीजन घेतात.रात्री कार्बन डायॉक्साईडचे उत्सर्जन करतात.म्हणून रात्री वृक्षाखाली झोपू नये असे म्हणतात.
पण... वटवृक्ष हा एकच असा आहे की तो रात्री सुद्धा ऑक्सीजन(प्राणवायू) उत्सर्जित करतो.
तसेच आईचेही सांगता येईल,
ती बाळाच्या जन्मापासून ते आपल्या स्वतःच्या मृत्यू पर्यंत बाळासाठीच जगते.अगदी प्राणवायू बनून...
आईला सांभाळा! ती हरवली तर तिच्या रुपातील आपला प्राणवायू निघून जाऊ शकतो.

  © पुष्पा पटेल  " पुष्पम्"
      म्हसावद.

ओल्या सांजवेळी!

सख्या ओल्या सांजवेळी  मन माझे हिंदोळ्यावर झुले  तू येण्याची चाहूल लागताच  हृदयी माझ्या वसंत फुले  सख्या ओल्या सांजवेळी  नजर माझी...