सर्जा राजाची जोडी
बघा सजली अंगणी
श्रावणात सण आला
बैल पोळा म्हणूनी
वर्षातुन एक दिवस
बैलांचा ह्या सणाला
बळीराजा करी कृतज्ञता
श्रावण अमावास्येला
झुल घालून अंगावर
बैलांना सुंदर सजवतो
रंगवून दोन्ही शिंगांना
फुगे गोंडे त्यांना बांधतो
नैवेद्य करतो आज खास
खीर अन् पुरणपोळीचा
घास अमृताचा भरवतो तेव्हा
आनंद बघावा बळीराजाचा
असा हा मित्र शेतकऱ्यांचा
राबतो वर्षभर निष्ठेने
उभ्या जगाचा पोशिंदा
जीवन जगतो कष्टाने
©®सौ पुष्पा पटेल "पुष्पम्"
म्हसावद जि नंदुरबार
अप्रतिमच रचना 👍🏻👍🏻👌🏻👌🏻
उत्तर द्याहटवाअप्रतिम बैलजोडीची कृतज्ञता व्यक्त करणारी कविता ताई
उत्तर द्याहटवासुंदर रचना 👍
उत्तर द्याहटवाअप्रतिम कृज्ञतापूर्वक
उत्तर द्याहटवाअप्रतिम शब्दगुंफण मॅडमजी ✍️👌👌
उत्तर द्याहटवा