जगून घ्यावा प्रत्येक क्षण
क्षणभराचा सुखासाठी
दुखवू नका कुणाचं मन !
काही काळासाठी आहोत
आपण पाहुणे भूतलावरी
लक्षात असू द्या ही समज
गोड रहा सर्वांशी साखरेपरी
गमतीनेही चोळू नका हो!
कुणाच्या दुखण्यावर मिठ
मरणातही जगाने गावे
आपले प्रीतगोडवे अविट
©®सौ.पुष्पा पटेल " पुष्पम् "
वाह!! खुपच सुंदर 👌👌👌👌✍️✍️🙏🏼
उत्तर द्याहटवाखूप खूप धन्यवाद 🙏
हटवाअप्रतिम विचारदर्शन मॅडम ✍️👌👌👌
उत्तर द्याहटवा