तुझे जीवन सुगंधी गुलाबासारखे फुलावे
काट्यांशी सावध राहून त्यास तू खुडावे
तुझे तन मन तिन्ही सांज उमलावे
अत्यानंदाचा डोहात तू आकंठ डुंबावे
तुझ्या भरारीपुढती गगनही ठेंगणे व्हावे
पण् धरणीशी नाते तुझे घट्ट जुळावे
विहरतांना दशदिशी तुझ्या किर्तीला पंख फुटावे
माणूसकीचा उर्ध्व दिशेने तू उंच उंच उडावे
©®सौ. पुष्पा पटेल "पुष्पम् "
Nice 👍
उत्तर द्याहटवाअप्रतिम रचना केलीत ताई
उत्तर द्याहटवाअप्रतिम काव्य👌👌👍
उत्तर द्याहटवाKhup sundar 👌👌👌
उत्तर द्याहटवाशब्दाशब्दात आईच्या ममत्वाची लाट उठतांना दिसते.हे जिव्हाळ्याचे झरे आईच्याच हृदयातूनच प्रसवू शकतात. अप्रतिम शब्दभावना मॅडम ✍️👌🌟🌟🌟🌟🌟🌟
उत्तर द्याहटवा