सख्या,संसाराचा मांडलाय ना डाव
मग खेळू आपण तो आनंदें
तू जिंकलास तरी डाव आपलाच!
मी जिंकले तरी डाव आपलाच!
पण...त्यात रड मात्र नसावी
अखंड सोबत मला तुझी असावी
सुखदुःखाचा लाटेतही करु
जीवननौका ही आपुली पार
माहिती रे!सारे हे डाव घडीचे
पर्वा कुणाची का करावी ?
आपणच एकमेकांना जवळचे!
हाती हात घेऊन चालायचे...!
©®सौ. पुष्पा पटेल " पुष्पम् "
सुंदर रचना
उत्तर द्याहटवाअभिनंदन उभयतांचे 🍧🍧
उत्तर द्याहटवा🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
आबा...✍️
व्वा... अप्रतिम रचनाविष्कार मॅडमजी!✍️👌👌👌👌
उत्तर द्याहटवाफारच सुंदर ✍️👌🏻👌🏻
उत्तर द्याहटवा